Amit Shah esakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah : अमित शाह मराठा आरक्षणावर बोलले; आश्वासन देत म्हणाले, राज्यात भाजपचं सरकार...

संतोष कानडे

पुणेः पुण्यामध्ये भाजपचं महाअधिवेशन सुरु आहे. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठा आरक्षणावरुन आश्वासन तर दिलंच. पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार होतं, तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं, अशी आठवण सांगितलं.

भाजपच्या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते,पदाधिकाकारी, कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, २०२४ मध्ये पुन्हा कमळाच्या युतीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे. कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागणं आवश्यक आहे. साठ वर्षांमध्ये पहिल्यांदा देशामध्ये एका व्यक्तीच्या हातात सरकार देण्याचं काम देशातील जनतेने केलं आहे.

''कार्यकर्त्यांमध्ये थोडसं कन्फ्युजन होताना दिसून येत आहे, परंतु कसलाही गैरसमज करुन घेण्याची गरज नाही. त्यासाठी एक उदाहरम देतो, दोन मुलं आहेत.. एकाच वर्गात शिकत होते. एक ८० टक्के घेऊन वर्गात नंबर एकवर येत होता तर दुसऱ्या वेळेस त्याने ९० टक्के घेण्याचा संकल्प केला. जो दुसरा विद्यार्थी होता ते चार वर्षात त्याच वर्गात होता. त्याला २० मार्क पडायचे. यावेळी त्याने २५ मार्कांची अपेक्षा ठेवली होती. निकाल आला तेव्हा ८० टक्केवाल्या विद्यार्थ्याला ७५ मार्क मिळाले आणि २० वाल्याला २५ मार्क मिळाले. असाच प्रकार आपल्या बाबतीत घडला आहे.''

अमित शाह पुढे म्हणाले की, पवार साहेबांना आज सांगतो की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजप सरकार येतं तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं. जेव्हा सरकार जातं तेव्हा मराठा रिझर्व्हेशन गायब होतं. २०१४ मध्ये मराठा आरक्षण लागू केलं तेव्हा भाजपचं सरकार होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मधल्या काळात शरद पवारांचं सरकार होतं, मराठा रिझर्व्हेशन गायब झालं. आता पुन्हा आमचं सरकार आलं आम्ही मराठा आरक्षण दिलं आहे. मराठा आरक्षण कायम ठेवायचं असेल तर भाजपचंच सरकार पाहिजे. मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम केवळ भाजपने केलं आहे, असं अमित शाह म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT