मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उठाव केलेल्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली असतानाच शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपली खदखद व्यक्त केली.
‘‘एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांची नाराजी साहजिकच आहे. राष्ट्रवादी आमच्यावर अन्याय करत आहे, असे सांगत हे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. मात्र आता राष्ट्रवादीच भाजपसोबत आल्याने मोठी अडचण झाली आहे.
शिवसेनेच्या ४० आमदारांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपला साथ देऊन चूक केली, अशी भावना या आमदारांमध्ये निर्माण झाली आहे. जी नवी युती केली त्याबद्दल विचारविनिमय केला जायला हवा होता. पण आम्हाला विश्वासात न घेता हे केले जात आहे,’’ अशी खंत कडू यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.