Eknath Khadse Chandrakant Patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

शपथविधी पार पडताच चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंना भरवला पेढा

विधान परिषदेच्या 10 नवीन आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतलीय.

सकाळ डिजिटल टीम

विधान परिषदेच्या 10 नवीन आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतलीय.

Maharashtra Politics : राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदारांचा आणि राज्याच्या विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदारांचा नुकताच शपथविधी पार पडला. महाराष्ट्रातून निवडून आलेल्या सहापैकी तीन सदस्यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्रातून निवडून आलेल्या केंद्रीय मंत्री पियूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) या भाजपच्या तीन खासदारांनी काल शपथ घेतली. तर, विधान परिषदेच्या 10 नवीन आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.

राज्यसभेचे सदस्य म्हणून महाराष्ट्रातून सहा सदस्य निवडून गेले आहेत. भाजपचे राज्यसभा सदस्य म्हणून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी हिंदीतून तर अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी मराठीतून शपथ घेतली. तर, शिवसेना नेते संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असल्यामुळं त्यांचा शपथविधी झाला नाहीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे देखील अनुपस्थित होते.

''मी अनेक वर्ष विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षनेता म्हणूनही मी काम केलंय. आताही विरोधी पक्षाचं काम करावं लागणार आहे. त्यामुळं सत्ताधारी पक्षातील चुका, उणिवांवर प्रहार करण्याची संधी मला मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केला. ते काल विधान परिषदेमध्ये सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर बोलत होते.

यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. खडसेंना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही पेढा भरवून अभिनंदन केलं. खडसेंनीही तो सहर्षपणे स्वीकारला. दोन्ही नेत्यांनी यावेळी राजकीय प्रगल्भतेचं दर्शन घडविलं. २०१७ मध्ये फडणवीस सरकारमधून राजीनामा दिल्यापासून खडसेंचा राजकीय विजनवास सुरू होता. विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपनं उमेदवारी नाकारली आणि मुलगी रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली. पण, त्यांच्या पराभव झाला. त्यानंतर मागील वर्षी एकनाथ खडसे यांनी भाजपमधील अंतर्गत राजकारणाला वैतागून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

विधान परिषद सदस्यांचा शपथविधी

विधान परिषदेच्या (Legislative Council Election) 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी काल विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडला. भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी या सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT