मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची आज पंजाबमधील फिरोजपूर (Firozpur Punjab) येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता. सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींना पुन्हा भटींडा विमानतळावर नेण्यात आले. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आक्रमक झाले असून त्यांनी पंजाब सरकारवर टीका केली.
देशाचे पंतप्रधान यांच्या सुरक्षेची पंजाब सरकारने काळजी घ्यायला हवी. रोड क्लियरन्स कोणी दिला होता? पंजाब सरकारनेच ना? देशाच्या पंतप्रधानांसोबत तुम्ही खेळ खेळता हे योग्य नाही. पंजाब सरकारने पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी काळजी घेतली नाही. त्या रोडला सामान्य लोकांना प्रवेश देत आहात हे योग्य नाही. याची चौकशी झाल्यानंतर हे सर्व समोर येईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
केंद्र आणि राज्यात सलोख्याचे संबंध असायला हवे. पण, विरोधकांना या देशात अराजकता माजवायची आहे. चौकशीमधून पंजाब सरकारची चूक आहे हे समोर आले तर पंजाब सरकार मान्य करणार आहे का? राज्यपालांबाबत देखील आपण बघतो. पत्रात कसली भाषा वापरली जाते. या देशात स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे, असंही पाटील म्हणाले.
नेमकं काय घडलं? -
गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ''हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला होता. त्यावेळी काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचं दिसून आलं. या आंदोलकांमुळे पंतप्रधान जवळपास 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही एक मोठी चूक होती. पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि त्यांच्या प्रवासाचा आराखडा पंजाब सरकारला अगोदरच कळवण्यात आला होता. प्रोटोकॉलनुसार, त्यांना लॉजिस्टिक, सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करावी लागते. तसेच ऐनवेळी काही घडल्यास त्यासंदर्भातील योजनाही तयार ठेवावी लागते. मात्र, पंजाब सरकारने यासंदर्भात कसलीही सुरक्षा तैनात केली नव्हती'', असे आरोप देखील निवेदनातून करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.