मुंबई : महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक (nawab malik) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर वारंवार गंभीर आरोप करत आहे. सोमवारी त्यांनी वानखेडेंचा धर्म मुस्लिम असल्याचा खुलासा केला होता. मात्र, वानखेडेंनी ते आरोप फेटाळून लावले. तसेच शिवसेनेचे संजय राऊतांनी (sanjay raut) देखील समीर वानखेडे प्रकरणावरून टीका केली आहे. त्यावरूनच आता भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
कोकणातील वादळग्रस्तांना मोबादला मिळत नाही. शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठवाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. आरोग्य विभागात घोटाळा होत आहे. एमपीएससीच्या तरुणांचे भविष्य अंधारात ढकललं जातंय. दररोज राज्यातील लहान मुली, महिला यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत. या सर्व विषयांवर आपल्याला भाष्य करायचे नाही. पण तुम्हाला NCB सारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टार्गेट करायचं आहे. त्यांच्यावर वैयक्तीक हल्ले करून त्यांच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
'जनाब राऊत...'
''जनाब संजय राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे, हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे. अहमदनगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यांना विरोध करणाऱ्यांचे डोके फोडले जातात. तुमची यंत्रणा मात्र उलट विरोध करणाऱ्यांवर कारवाई करते. यावर तुम्हाला बोलायचं नाही. कारण जनाब राऊत तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय राऊत नेमके काय म्हणाले?
नवाब मलिक हे कॅबिनेट मंत्री आहेत. ते बोलतात म्हणजे सरकार बोलत असते. सर्व पुरावे समोर आल्यानंतर राज्य सरकारने कायदेशीर करावी. तसेच ही कारवाई होतपर्यंत समीर वानखेडे यांना अधिकारीपदी राहण्याचा अधिकार नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी सामनामधून देखील भाजपवर टीका केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.