Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sakal
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : भाजपच्या कोअर कमिटीची दिल्लीतील बैठक संपली; महाराष्ट्रात नेतृत्वबदल होणार का? पियूष गोयल म्हणाले...

संतोष कानडे

नवी दिल्लीः राज्यातल्या भाजप नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये आयोजित केली होती. रात्री ९ वाजता बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पियूष गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यामध्ये नेतृत्वबदल होईल का किंवा फडणवीस सरकारच्या बाहेर पडतील का? या प्रश्नावर गोयल यांनी उत्तर दिलं.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये महायुतीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यश-अपयशाची चर्चा झाली. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला केवळ ०.३ टक्के मतं कमी पडले.

फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही कुठे कमी पडलो यावर चर्चा झाली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना समोरं जाताना काय केलं पाहिजे, घटकपक्षांना सोबत घेऊन कशा पद्धतीने पुढे जाता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली असून अत्यंत ताकदीने आम्ही पुढच्या निवडणुका लढणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी निकालानंतर सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली होती. मंत्रिपद सोडून पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा असून येणाऱ्या विधानसभा निवडणुका ताकदीने लढता येतील, अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु राज्यासह केंद्रातल्या भाजप नेत्यांनी त्यांची ही इच्छा नाकारली.

यासंदर्भात बैठकीनंतर प्रश्न विचारला असता, पियूष गोयल म्हणाले की, राज्याच्या भाजपमध्ये कुठलाही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यावरुन आता राज्य भाजपमध्ये जैसे थे अशीच परिस्थिती राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : शिव्या देतो... प्लेअरची धरतो कॉलर तरी कॅप्टन रोहित सर्वांना हवा हवासा का वाटतो?

DY Chandrachud: CJI चंद्रचूड यांचा न्यायाधिशांना महत्वाचा सल्ला; स्वतः ला देव अन्...

Ind vs Sa T20 WC Final Live Score : बार्बाडोसमध्ये सूर्यदेवाचं 'प्रखर' दर्शन; रोहितने नाणेफेक जिंकली अन् सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला

Arvind Kejriwal : ''अरविंद केजरीवालांची कोठडी आम्हाला नकोय..'', CBIने कोर्टात मांडलं म्हणणं; त्यावर न्यायाधीश म्हणाले...

Car Accident : दिघी-आळंदी मार्गावर कारची दुचाकीला जोराची धडक; तरुणाचा जागीच अंत, एकजण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT