Gopichand Padalkar Challenge to Anil Parab on ST Worker Strike google
महाराष्ट्र बातम्या

किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दांचा मान राखा, पडळकरांचं परबांना आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Worker Strike) तोडगा काढण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar), परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) आणि कृती समितीची बैठक झाली. त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं. पण, कर्मचारी अजूनही मोर्चावर ठाम आहेत. त्यावरूनच आता भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (BJP Leader Gopichand Padalkar) यांनी मंत्री परबांना आव्हान दिलंय.

थेट कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? -

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून सर्वजण दरवाजे ठोठावत आहेत. त्यापेक्षा अनिल परब यांनी स्वतः आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? त्यांनी कर्मचाऱ्यांना स्वतः भेटावं आणि बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात येईल, असं आश्वासित करावं. त्यामुळे चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असा सल्ला गोपीचंद पडळकर यांनी परबांना दिला आहे.

परबांना आव्हान -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा. त्यांच्यासोबत चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असं आव्हान पडळकरांनी परबांना दिलं आहे.

'...म्हणून शरद पवारांना तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडले'

एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीनं लढा दिला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन आहे. कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसुलात घट आणली. त्यामुळेच शरद पवारांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडले, असंही पडळकर म्हणाले.

पवारांची कृती समितीसोबत बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं. तसेच कृती समितीने एसटी कर्मचाऱ्यांचा वकील गुणरत्न सदावर्ते यांना बदलणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच कृती समितीच्या सदस्यांनी सदावर्तेंवर टीका देखील केली होती. त्यांच्या आक्रस्ताळेपणामुळे कर्मचाऱ्याची रोजी-रोटी जाणार असल्याचे म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनची Century! ट्वेंटी-२०त विराट-रोहितच काय, तर एकाही भारतीयाला नाही जमलाय हा विक्रम

Assembly Election 2024 : पालघर जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का; कुणबी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा

Champions Trophy 2025 : BCCI पाकिस्तानात न जाण्यावर ठाम; PCB म्हणते लेखी द्या, मग बघतोच...! IND vs PAK यांच्यात 'वॉर' जोरदार

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SCROLL FOR NEXT