Minister Girish Mahajan esakal
महाराष्ट्र बातम्या

Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणतात, पंधरा दिवसांत मोठा राजकीय भूकंप; राऊत म्हणाले, जपान...

संतोष कानडे

मुंबईः येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. महाजनांच्या दाव्याला ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मिश्कीलपणे उत्तर दिलंय.

काय म्हणाले गिरीश महाजन?

निवडणुकीच्या आधी राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे. कुठल्या पक्षात काय होईल, ते कळेलच. पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये हा राजकीय भूकंप होईल. भाजपमध्ये येण्यासाठी अनेक पक्षातले अनेक नेते इच्छूक आहेत.

''भूकंप व्हायला हा महराष्ट्र आहे, जपान नाही!''

भूकंप व्हायला हा महाराष्ट्र आहे, जपान नाही. जेव्हा २०२४ मध्ये खऱ्या अर्थाने भूकंप येईल, तेव्हा हे सगळे वाहून जातील. ईडीच्या भीतीने पक्ष फोडणं याला भूकंप म्हणत नाहीत. विरोधकांवर धाडी घालणं, त्यांना तुरुंगात पाठवणं याला भूकंप म्हणत नाहीत तर डरपोकपणा म्हणतात.

दरम्यान, २०१९मध्ये ज्या पद्धतीने भाजपकडे मेगाभरती झाली होती. तशीच भरती आता २०२४च्या निवडणुकीपूर्वी होईल, असं सांगितलं जातंय. यासंदर्भात भाजपचे नेते वारंवार बोलत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये फूट पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT