Unmesh Patil With Shivsena UBT Esakal
महाराष्ट्र बातम्या

Unmesh Patil With Shivsena UBT: उन्मेष पाटलांचं अखेर ठरलं! ‘मातोश्री’वर आज बांधणार शिवबंधन, निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का

Unmesh Patil With Shivsena UBT: उन्मेष पाटलांचा ठाकरे गटातील प्रवेश निश्‍चित मानला जात असून, आज बुधवारी (ता. ३) दुपारी साडेबाराला ‘मातोश्री’वर त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

जळगाव: भारतीय जनता पक्षाने तिकीट कापलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी मंगळवारी (ता. २) मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व पाठोपाठ उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पाटलांचा ठाकरे गटातील प्रवेश निश्‍चित मानला जात असून, आज बुधवारी (ता. ३) दुपारी साडेबाराला ‘मातोश्री’वर त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. उन्मेष पाटील यांच्याबरोबर त्यांचे मित्र व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवारही ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. लोकसभा उमेदवारीसाठी करण पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब जवळपास झाले आहे.

पाटलांचा भाजपशी काडीमोड

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जाहीर झालेली स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटलांना जळगाव लोकसभेची उमेदवारी ऐनवेळी देण्यात आली होती. साडेचार लाखांच्या मताधिक्याने त्यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकरांचा पराभव केला. पाच वर्षांत खासदार म्हणून काम चांगले असूनही उमेदवारी कापल्याच्या नाराजीतून त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

दिवसभर मुंबईत खलबते

उन्मेष पाटील काही दिवसांपासून मतदारसंघात नाहीत. त्यांची पक्षावरील नाराजीही स्पष्टपणे दिसून येत होती. काही दिवसांत ते मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी चिन्हे होती. त्यानुसार त्यांनी काही दिवसांपासून मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार व ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मंगळवारी दिवसभर ते मुंबईत होते. सामना कार्यालयात त्यांनी सकाळी संजय राऊत यांची भेट घेतली.

जळगाव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत, जळगाव महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन त्यांच्यासोबत होते. ही मैत्रीपूर्ण भेट असल्याचे त्यांनी माध्यमांना भेटीनंतर सांगितले. अर्थात, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली व या भेटीनंतर त्यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाला पुष्टी मिळाली.

आज शिवबंधन बांधणार

दिवभरात मुंबईत झालेल्या भेटी, चर्चा व खलबतांनंतर उन्मेष पाटलांचा ठाकरे गटातील प्रवेश निश्‍चित झाला आहे. बुधवारी दुपारी साडेबाराला ‘मातोश्री’वर त्यांचा प्रवेश सोहळा होईल. सोबत करण पवार व आणखी काही नेते प्रवेश करतील.

बावनकुळेंकडून संपर्क

दरम्यान, मंगळवारी मुंबईत या घडामोडी घडत असताना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उन्मेष पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पाटील यांना समजाविण्याचे प्रयत्न सुरू असून, ते भाजप सोडणार नाही, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

अशी असू शकतील समीकरणे

उन्मेष पाटील करण पवारांच्या मागे पूर्ण ताकद उभी करतील

भाजपतील नाराजांची मोट बांधून त्यांची मदत घेतील

उन्मेष पाटलांच्या पाठबळाने भाजप उमेदवार स्मिता वाघांना तुल्यबळ लढत देता येईल

उन्मेष पाटील स्वत: चाळीसगाव विधानसभेसाठी ‘कमिटमेंट’ घेतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT