चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी जर केंद्राचं नेतृत्व केलं, तर आम्ही त्याचं स्वागत करतो, पण त्याआधी जे आहे टिकवता आलं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला
मुंबई- चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी जर केंद्राचं नेतृत्व केलं, तर आम्ही त्याचं स्वागत करतो, पण त्याआधी जे आहे टिकवता आलं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचं म्हटलं होतं. यावरुन बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. (bjp leader chandrashekhar bawankule criticize cm uddhav thackeray jharkhand)
मी काही राष्ट्रीय नेता नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. मी झारखंडला कधीच गेलो नव्हतो. झारखंडच काय रांचीलाही गेलो नाही, असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. झारखंड सरकार पाडण्यात बावनकुळे यांचा हात असल्याची चर्चा सुरु झाली होती. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या मुद्द्यावरुन त्यांच्यावर टीका केली होती. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
झारखंड सरकार पाडण्यात माझं नाव हा आरोप खूप हास्यास्पद आहे. माझा त्याच्याशी काही संबध नाहीय, मी कधीच झारखंडला गेलो नाहीय. झारखंडच काय रांचीलाही गेलो नाही. मी भाजप पक्षाचा एक साधा कार्यकर्ता आहे. झारखंडमधील 181 आमदारांसोबत माझा कसलाही संपर्क नाही, असं बावनकुळे म्हणाले. पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत, त्या नाराज नाहीत. आमचे विरोधक अशा बातम्या पसरवत आहेत, असंही ते म्हणाले.
बावनकुळे यांनी महापुराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. महापुरामध्ये प्रशासकीय यंत्रणेचे अपयश आहे. महापुराच्या ठिकाणी सरकार मदत जाहीर करत नाहीय. लोक मरत आहेत, त्यांना मदत करायची गरज आहे, असं ते म्हणाले. विदर्भात एक हजार कोटीचा तांदूळ घोटाळा झाला, यावर सरकार बोलत नाहीय. लोकल, मंदिरांवर हे सरकार निर्णय घेत नाहीय, अशी टीका त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.