राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वादग्रस्त विधान केलंय. यामुळं सध्या ते चर्चेत आहेत. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती (Saraswati) आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ब्राम्हण महासंघानंही भुजबळांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी भुजबळांवर जोरदार टीका केलीय. चित्रा वाघ यांनी ट्विट करत भुजबळांना लक्ष केलं. नथुराम गोडसेचे (Nathuram Godse) पुतळे उभे करू, असं भुजबळांनी म्हंटलं होतं, याची आठवण त्यांनी करून दिली. आपल्या ट्विटमध्ये वाघ म्हणतात, "एकेकाळी नथुरामचे पुतळे उभारू असे म्हणणारे भुजबळ साहेब हेचं. क्रांतीज्योती सावित्रीमाईंची पूजा करायला हवी पण सरस्वतीला विरोध कशासाठी? ते ज्या साडेतीन टक्क्याबद्दल बोलतायत, त्यातल्याच एकाच्या भिडे वाड्यात सावित्री माईंची शाळा भरली होती, हे सोयीस्कर विसरायचं का..? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
सोमवारी छगन भुजबळ यांनी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित महोत्सवात उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजे, त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. देशात अंधश्रद्धा वाढीला लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केलाय.
भुजबळ म्हणाले, अंधश्रद्धा आणि आमच्या महिला-भगिनींबाबत काही विचारायला नको किंवा काही सांगायला नको. शाळांमध्ये सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. पण सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा फोटो लावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावा. कारण सरस्वतीचा, शारदा यांना आम्ही काही पाहिलं नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवलं नाही. त्यांनी तीन टक्के लोकांना शिकवलं. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवलं त्यांची पूजा कशासाठी करायची, असंही भुजबळ म्हणालेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.