bjp leader devendra fadanvis mi punha yein video deleted by bjp Maharashtra knp94 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: 'मी पुन्हा येईन'च्या व्हिडिओमुळे खळबळ माजताच भाजपकडून व्हिडिओ डिलिट

कार्तिक पुजारी

मुंबई- भाजप महाराष्ट्रकडून देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. यामध्ये देवेंद्र फडणवीस 'मी पुन्हा येईन' असं म्हणताना दिसत होते. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होईल का? अशी शंका व्यक्त केली जात होती. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्यानंतर भाजपने हा व्हिडिओ डिलिट केला आहे. (bjp leader devendra fadanvis mi punha yein video deleted by bjp Maharashtra)

भाजप महाराष्ट्रकडून सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा येईनचा नारा दिला होता. त्यामुळे फडणवीस शिंदेंना दूर करुन पुन्हा मुख्यमंत्री होतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. विरोधक आणि सत्ताधारी यांच्याकडून यावरुन प्रतिक्रिया येऊ लागल्या होता.

व्हिडिओमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. शिंदे गटाच्या नेत्यांनी यावर सावध भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. आपण व्हिडिओ पाहिला नाही असं म्हणत त्यांनी विषय टाळला होता. राजकीय वातावरण तापू लागलं होतं. व्हिडिओमुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे भाजपकडून हा व्हिडिओ डिलिट करण्यात आला.

शिवसेनेमधून फुटून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी घरोबा केला होता. शिंदे गटाकडे ४० आमदार होते, तर भाजपकडे १०५ आमदार होते. असे असताना देवेंद्र फडणवीस यांनी कमीपणा घेत उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं होतं. त्यामुळे अनेक भाजप नेते नाराज झाले होते. आता अचानक भाजपकडून फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला.

भाजपसोबत आता अजित पवार गटही आला आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ दोनशेच्या जवळपास गेले आहे. महायुतीचे सरकार आणखी बळकट झाले आहे. पण, तिन्ही पक्षात सर्वकाही आलबेल नाही असा संदर्भ घेऊन व्हिडिओकडे पाहिलं जातं होतं. पण, दोन तासांतच भाजपकडून व्हिडिओ डिलिट करण्यात आलाय. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात या, खेळा अन् मॅच झाल्यावर झोपायला दिल्लीत जा! PCB चा टीम इंडियासमोर अजब प्रस्ताव

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

Sports News on 18th October 2024: भारताचे कसोटी सामन्यात पुनरागमन ते पाकिस्तानचा इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT