मुंबई : मंत्रालयात जाऊन फाईल्स तपासताना मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केलेला नाही. मी केवळ घोटाळेबाज नेत्यांची माहिती घेतली, असे स्पष्टीकरण भाजप (bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी दिले आहे. किरीट सोमय्या यांनी नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स चाळल्याची छायाचित्रे नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मी कोणाच्या फाईल्स पाहिल्या, याची भीती काँग्रेसला का वाटत आहे?
काँग्रेस नेते सचिन सावंत (sachin sawant) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आपण कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसल्याचे सांगितले. तसेच मी कोणाच्या फाईल्स पाहिल्या, याची भीती काँग्रेसला का वाटत आहे, असा सवालही किरीट सोमय्या यांनी विचारला. काय म्हणाले सोमय्या?
मी तर एकटाच होतो मग फोटो काढला कुणी?
"फोटो कुणी काढला कुणी व्हायरल केला हा गोंधळ सुरू आहे. किरीट सोमय्या बसलेले आहेत आणि दोन कर्मचारी आहेत. म्हणजे आमच्या तिघांपैकी तर कुणी फोटो काढलेला नाहीय. मी तर एकटाच होतो मग फोटो काढला कुणी आणि व्हायरल केला कुणी? उद्धव ठाकरेंच्या माणसांनी काढला? की आदित्य ठाकरेंच्या एजंटनी काढला? की एकनाथ शिंदे यांच्या पीएनी की प्रताप सरनाईक? कुणी काढला फोटो? किरीट सोमय्या खुर्चीवर बसले हा विषय नाही. तर कुणाची खुर्ची धोक्यात आहे? याचा तपास व्हायला हवा.
चोरी पकडली गेली म्हणून हा फोटो व्हायरल झाला की काय?
मला तर उद्धव ठाकरे मदत करत आहे. फोटो व्हायरल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाला ना..मुद्दा असा आहे फाईलमध्ये काय होत? तर उद्धव ठाकरे खोटारडे आहेत हे फाईलमध्ये होतं. मंत्रिमंडळाने प्रस्ताव प्रारीत करताना तीन कोटी 8 लाख रुपये बुडवले. चोरी पकडली गेली म्हणून हा फोटो व्हायरल झाला की काय?
मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी आपण विश्वासघात करू शकतो याचे उदाहरण शिवसेनेत उद्धव ठाकरे यांनी घडवलं. आता विश्वासघाती मुख्यमंत्र्यांना प्रत्येक क्षणी खुर्चीची चिंता आहे की माझ्या पाठीत आणखी कुणी तरी खंजीर खुपसणार याची? मग ते प्रताप सरनाईक आहेत? एकनाथ शिंदे आहेत की अजित पवार आहेत जे खंजीर खुपसणार नाही ना?
आमच्या तिघांपैकी एकावर देखील कारवाई करून दाखवा
उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत नाही. आमच्या तिघांपैकी एकावर देखील कारवाई करून दाखवा मग दाखवतो. या धमक्या देऊ नका. नवाब मलिक यांचा बोलवता धनी शरद पवार आहेत. इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. पवार साहेब त्या नवाब मलिक यांना एवढं सांगा आयटम गर्ल म्हणून नका किमान आयटम बॉय तरी म्हणा अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.