Pravin Darekar VS Manoj Jarange Patil 
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसता अन्.. प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

कार्तिक पुजारी

मुंबई- मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले होते. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुमची भाषा आता राजकीय झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही राजकीय भूमिका घ्या, असं आवाहन दरेकर यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी. कारण ते आता राजकीय बोलत आहेत. मराठ्यांच्या हिताची आम्ही नेहमीच भूमिका घेत असतो. मराठा तरुण-तरुणींसाठी गेल्या १० ते १५ वर्षांपासून काम करत आहोत. तुम्ही भावनिक करून मराठा समाजाला राजकारणात ओढू नका. भूमिका नीट ठेवा आम्ही सोबत आहोत, असं दरेकर म्हणाले आहेत.

आता तुमच्या भूमिकेला राजकीय वास यायला लागला आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याची बसता अन् प्लॅनिंग काय तर कुणाला पाडायचं अन् कुणाला उभं करायचं. असंच करणार असाल तर खुली राजकीय भूमिका घ्या. मराठा समाजाच्या भावनांचा अशा प्रकारे राजकारणासाठी उपयोग करू नका, असं आवाहन त्यांनी केलं.

आता मराठा समाजाला हे कळू लागलं आहे. आपल्या आंदोलनाचं राजकारण होतंय हे लोकांना समजत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. कोर्टामध्ये ते टिकवण्याची हमी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. सगेसोयऱ्यांबाबत प्रक्रिया सुरु आहे. कागदपत्रांचा अभ्यास सुरु आहे. सरकार डोळे मिटून गप्प नाही, असं ते म्हणाले.

मनोज जरांगे राजकीय पोळी भाजून घेत आहेत. याचं आम्हाला दु:ख झालं आहे. मराठ्यांच्या भावनांचे राजकीय दुकान मांडू नका. हीच अपेक्षा आहे. बाकी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या प्रामाणिकपणाबाबत आदर आहे. त्यांचा कोणी वापर करू नये. त्यांच्या मार्फत कोणाचा अजेंडा राबवला जाऊ नये अशीच आमची अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT