Rohit Pawar on Raj Thackrey and BJP: शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) समावेश होण्याची चिन्हे आहेत. महायुतीच्या अनेक नेत्यांनी येत्या ४८ तासांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडेल, असे सूतोवाच केले होते. सध्या दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर समितीची बैठक सुरू असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत प्रदेश पातळीवर अनेक बडे नेते राजधानीमध्ये पोचले आहेत.
राज ठाकरेही काल सायंकाळी विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे हे आमच्या विचाराचे आहेत ते आले तर स्वागतच आहे असे जाहीर विधान केले होते. आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे.
शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांनी थोडा विचार केला पाहिजे. भाजपला आज गरज आहे, त्यामुळेच ते सर्वांना महत्त्व देत आहेत. जेव्हा त्याची गरज नसते तेव्हा ते बाजूला करतात. हे लक्षात घेऊन राज ठाकरेंनी महाविकास आघाडीत सामील होऊन महाराष्ट्र धर्म पाळण्याचा प्रयत्न करावा.
रोहित पवार पुढे म्हणाले, उत्तर आणि दक्षिण भारतात एक राज्य आहे, ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो. जी संतांची भूमी आहे. चांगल्या व्यक्तिमत्वाच्या विचारांनी प्रेरित आहेत. इथे जनता आपल्यासोबत नाही, अशी भाजपची भावना आहे. त्यामुळे भाजपला आता सर्व लहान-मोठ्या पक्षांना सोबत घेऊन मतांचे विभाजन करायचे आहे. सर्व पक्षांना एकत्र करणे शक्य असेल तर ते करू. 2019 मध्ये ज्या पक्षांना महत्त्व दिले गेले नाही अशा सर्वच पक्षांना महत्त्व दिले जात आहे.
मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. त्यांनी मविआ सोबत यावं ही आपली इच्छा आहे. भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा. भाजपसोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाही, म्हणून छोट्या पक्षांना सोबत घेत आहेत. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनता भाजपसोबत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे भाजप लहान-लहान पक्षांना सोबत घेऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे ज्या पक्षांना पाच वर्षांपूर्वी महत्व दिले जात नव्हते, त्यांची आठवण आता भाजपला झाली आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजप-शिवसेना-राषट्रवादी काँग्रेसच्या युतीत सामील होणार असल्याची चर्चा महाराष्ट्रात आहे. राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीत पोहोचले असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही तेथे उपस्थित असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांना एनडीएमध्ये आणण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे त्यांच्या पक्ष मनसेसाठी दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन जागांची मागणी करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.