solapur loksabha election sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठे मताधिक्य घेत ‘मी पुन्हा येईन’ म्हणालेले दोन्ही आजी-माजी खासदार प्रचारात सुद्धा नाहीत! डॉ. महास्वामींच्या जात प्रमाणपत्राचा निकाल अद्याप प्रलंबितच

मोदी लाटेत 2014मध्ये खासदार झालेले ॲड. शरद बनसोडे सध्या मुंबईत आहेत. तर विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय संपला नाही. दोघांनाही पक्षाने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले नाही आणि आता प्रचारापासूनही दूर ठेवले जात असल्याची चर्चा आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मोदी लाटेत २०१४मध्ये मोठ्या मताधिक्यांनी खासदार झालेले ॲड. शरद बनसोडे सध्या मुंबईत असतात. तर विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय पूर्णत: निकाली लागला नाही. दोघांनाही विद्यमान असतानादेखील पक्षाने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले नाही. आता सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुतेंच्या प्रचारापासूनही त्यांना दूर ठेवले जात असल्याची चर्चा आहे.

लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाख ८७ हजार ५९१ मते मिळाली होती आणि त्यावेळी त्यांनी भाजपचे ॲड. शरद बनसोडे यांचा ९९ हजार ६३२ मतांनी पराभव केला होता. पण, त्यानंतरच्या निवडणुकीत ॲड. बनसोडे यांनी पराभवाचा वचपा काढत श्री. शिंदे यांना दीड लाखांच्या मताधिक्यांनी पराभूत केले होते. तरीदेखील पक्षाकडून त्यांना ना उमेदवारी दिली ना पुढच्या निवडणुकीत प्रचारात उतरविले. आताही तसाच प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडील जातीचे प्रमाणपत्र खरे की खोटे याचा फैसला बाकी आहे. मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर आहे. त्यामुळे त्यांना प्रचारात उतरविले जाणार नाही, अशीही चर्चा आहे. या दोन्ही खासदारांनी १० वर्षांत काय केले, या प्रश्नाचे उत्तर विद्यमान उमेदवाराला प्रचारावेळी द्यावे लागेल हे निश्चित. सोलापुरातून इच्छुक असलेले माजी खासदार अमर साबळे यांनीही उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात टीकेचे व्हिडिओ प्रसारित केले, पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तेही शांतच आहेत. दरम्यान, पक्षाने डॉ. महास्वामींची ‘मी पुन्हा येईन’ची इच्छा असतानाही त्यांना उमेदवारी दिली नाही. आता त्यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भातील अंतिम निकाल काय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दोन्ही खासदारांना ऐतिहासिक मतदान, तरीदेखील...

भाजपचे तत्कालीन खासदार ॲड. शरद बनसोडे यांना मोदी लाटेत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून तब्बल पाच लाख १७ हजार ८७९ मते मिळाली होती. जवळपास दीड लाख मतांनी त्यांचा विजय झाला होता. त्यानंतरही पक्षाने त्यांना उमेदवारी न देता डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी या नवख्या चेहऱ्याला उमेदवारी दिली. त्यांनीही २०१९च्या निवडणुकीत तब्बल पाच लाख २४ हजार ९८५ मते घेतली आणि एक लाख ५८ हजार ६०८ मतांनी दुसऱ्यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला. मात्र, पक्षाने आता पुन्हा एकदा उमेदवार बदलून आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरविले आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक मतदान घेणाऱ्या दोन्ही खासदारांना प्रचारापासून दूर ठेवले जात असल्याची स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT