Uddhav Thackeray And BJP esakal
महाराष्ट्र बातम्या

यह तो झांकी है, मुंबई महापालिका बाकी है; भाजपचा उद्धव ठाकरेंना इशारा

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गटात जल्लोषाचे वातावरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता.२९) राजभवनात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपला राजीनामा पत्र दिले. राजभवनाच्या सूत्रांनी सांगितले, की राज्यपालांनी ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मुख्यमंत्रीपदावर राहण्यास सांगितले. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतरही भाजपच्या गटात जल्लोष सुरु झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीकास्त्र सोडले आहे. (BJP Mumbai Unit Say This Is Beginning After Uddhav Thackeray Resignation)

या वर्षी होणाऱ्या मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीवरुन भाजप म्हणते, की ही तर केवळ झांकी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) जगातील सर्वात श्रीमंत आणि मोठी महानगरपालिका आहे. तिला शिवसेनेची सर्वात मोठी ताकद मानली जाते आणि अनेक वर्षांपासून पक्षाचा येथे दबदबा आहे. महापालिकेने यंदा २०२२-२३ साठी ४५ हजार ९४०.७८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यावरुन महापालिकेची ताकद दिसून येते.

यह तो झांकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है

मुंबई भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे, की यह तो झांकी है...मुंबई महापालिका अभी बाकी है! या बरोबरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रही शेअर केले आहे. यात ते आपल्या हातात बॅट घेऊन उभे असल्याचे दिसत आहेत. या व्यतिरिक्त भाजप महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवी हे ट्विटमध्ये म्हणाले, कर्म कोणालाही सोडत नाही. या ट्विटबरोबर त्यांनी पालघर हिंसेशी संबंधित छायाचित्र शेअर केले. रवि दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हणतात, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याच्या घोषणेचा मी स्वागत करतो. त्यांना त्याच दिवशी कळले होते, की जेव्हा शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाला धोका दिल्याबद्दल बंड केले होते. त्यांच्या कार्यकाळाने सिद्ध केले की संधीसाधू आघाडी टिकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT