राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ( २ मे ) ते पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचंजाहीर केलं. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यासोबतच राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गजांनी तसेच विरोधीक्षातील नेत्यांनी देखील पवारांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शरद पवारांनी अचानक जाहीर केलेल्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभर पाहायला मिळाले. राज्यातील अनेक राष्ट्रवादी पदाधीकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे द्यायला सुरूवात केली. तर काही कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी 'सिल्व्हर ओक' बाहेर धरणे देखील धरले.
यानंतर शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागीतला, त्यानंतर कार्यकर्ते घरी परतले. मात्र शरद पवारांनी त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा हे फक्त राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच नाही तर विरोधी पक्षातील नेते देखील बोलून दाखवत आहेत.
यामध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायाण राणे यांचाही समावेश आहे. शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत , “शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुद्धा हवेत,” असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
तर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील शरद पवारांसाठी ट्वीट केलं आहे. शरद पवार हे देशातील एकमेव राजकीय कार्यकर्ते घडवणारे विद्यापीठ असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणाले आहेत की, "मा. शरद पवार साहेब हे देशातील एकमेव राजकीय कार्यकर्ते घडवणारे विद्यापीठ आहे.. माझ्यासारखे ग्रामीण भागातील राजकीय पार्श्वभूमी नसलेले असंख्य कार्यकर्ते साहेबांनी राजकारणात आणून त्यांना लोकप्रतिनिधी बनवलं आहे.."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.