Bjp and Congress esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : भाजपला प्रतीक्षा नव्या प्रभारीची! तर विरोधी पक्षनेत्याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम कायम

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष नव्या नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. काँग्रेस पक्षात गेला महिनाभर विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी कुणाला नेमले जाणार याची प्रतीक्षा सुरू आहे, तर भाजपच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांपैकी महाराष्ट्राचे प्रभारी कुणाला केले जाणार, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

कैलास विजयवर्गीय हे भाजपच्या नव्या सरचिटणीसांपैकी सर्वात ज्येष्ठ असल्याने त्यांना महाराष्ट्रात पाठवले जाणार काय याबद्दल उत्सुकता आहे. एकेकाळी महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरोज पांडे यांच्याकडेच पुन्हा महाराष्ट्र सोपवला जाणार की तरुण चुग यांना नेमले जाणार, अशी विचारणा आज सुरू होती.

महाराष्ट्र हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या या भागात ही जबाबदारी कुणावर टाकली जाणार, हे राष्ट्रीय राजकारणासाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे अघोषित प्रमुख आहेत. त्यांच्या मदतीला नेमके कुणाला दिले जाणार? त्यांचे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत नियुक्तीपूर्वी विचारात घेतले जाणार का? असे प्रश्न आहेत.

सध्या भाजपबाबत कोणताही अंदाज व्यक्त करता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा हे तिघे जो निर्णय घेतात तो नंतरच कळतो, असे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने नमूद केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. याचा फायदा करून घेणारा प्रभारी दिला जाईल, हे स्पष्ट आहे.

केंद्र आणि राज्यातील भाजपशी संबंध ठेवणारे प्रभारी हे भाजपच्या व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. उद्या (ता. ३१) रोजी प्रभारी कोण ते घोषित केले जाईल. महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या सी. टी. रवी यांना राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांतून वगळण्यात आले आहे. त्यांना कर्नाटक भाजपचे प्रमुख करण्यात येईल, अशीही चर्चा आहे.

दिल्लीच्या पत्राची प्रतीक्षा

दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या तीन दिवसांत तरी काँग्रेस विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड करेल काय, याबद्दल संभ्रम आहे. अधिवेशनकाळात हा नेता नेमला गेला तर प्रभावी कामगिरी नोंदवली जाऊ शकते. मात्र, सध्या कोणती हालचाल सुरू आहे, याचीही माहिती बहुतांश नेत्यांना नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही यासंबंधात विश्वास घेतले जाईल, अशीही चर्चा आहे. मात्र, त्यास दुजोरा मिळू शकला नाही. साखर कारखाना तसेच शिक्षण संस्थांचे जाळे नसलेल्या नेत्याला या पदावर नेमले जावे म्हणजे भाजप या नेत्याला मोहजालात अडकवू शकणार नाही किंवा दबाव आणणार नाही, अशी चर्चा आहे.

एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार असे विरोधी पक्षनेतेपदावर काम करणारे नेते भाजपच्या छावणीत निघून गेल्याने काँग्रेस सावध पावले टाकणार आहे, असे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT