Pankaja Munde Meets Prakash Ambedkar 
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde Meet Prakash Ambedkar : पंकजा मुंडेंनी घेतली आंबेडकरांची भेट! काय होतं कारण? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

रोहित कणसे

राज्यातील सर्व राजकीय पक्ष सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान हलचालींन वेग आलेला असतचानाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सध्या आरक्षण बचाव यात्रा काढली जात आहे. ही यात्र राज्यातील वेगवेगळ्या शहरातून जात आहे. यादरम्यान आज लातूर येथून बीडमध्ये जात असताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. या भेटीनंतर दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

भेट कुठे झाली?

आरक्षण बचाव यात्रेच लातूर येथील टप्पा संपवून प्रकाश आंबेडकर बीडकडे निघाले होते. तर त्याचवेळी पंकजा मुंडे या बीडवरून लातूरकडे निघाल्या होत्या. यावेळी दोन्ही नेत्यांची लातूर आणि बीडच्या मध्ये भेट झाली. यावेळी दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या भेटीचे फोटो पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

"वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश आंबेडकर जी यांची आज नियोजित दौऱ्यानिमित्त लातूरकडे जाताना भेट झाली. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आरक्षण बचाव यात्रेला शुभेच्छा दिल्या." असे पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

आरक्षण बचाव यात्रा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण पाहायला मिळत आहे. दोन्ही समाजाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे एकंदरीतच राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे आग्रही आहेत. तर दुसरीकडे, ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन केले होते. यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील भूमीका घेत राज्यात 'आरक्षण बचाव' यात्रा काढली आहे.

आरक्षण बचाव यात्रा ही पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, धाराशीव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना या शहरातून काढण्यात येणार आहे. तसेच या यात्रेचा शेवट हा सात ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होणार आहे.

या यात्रेवेळी ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या जातील. तसंच मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील असे यापूर्वीच सांगण्यात आले होते. या यात्रेच्या प्रमुख मागण्या या ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे. एसी, एसटी समाजाची स्कॉलरशीप डबल झाली पाहिजे. केंद्रातील स्कॉलरशीपमध्ये राज्य स्वतः चा हिस्सा देत नाही. तसंच ओबीसीच्या विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशीप मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT