JP Nadda  esakal
महाराष्ट्र बातम्या

JP Nadda : विरोधकांच्या मागे फरपटत जाण्यापेक्षा...; भाजप अध्यक्ष नड्डांच्या पक्षातील नेत्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जगामध्ये भारताला एक ताकदवान देश म्हणून समोर आणलेले आहे. आपली अर्थव्यवस्था देशातील महामार्ग, रेल्वेचे जाळे तयार झाल्याने विकासाची घोडदौड चालू आहे.

सरकारने केलेली कामे, योजना नागरिकांना सांगा, त्यांच्याशी संवाद साधा. विरोधकांच्या टीकेने खचून, त्यांच्या मागे फरपटत जाऊ नका. आपला राजकीय अजेंडा आपणच सेट करायचा असतो", असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्य समितीची बैठक बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीच्या समारोपप्रसंगी जे. पी. नड्डा बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे, तरुण चुघ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, सुनील देवधर, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आदी यावेळी उपस्थित होते.

नड्डा म्हणाले, "काँग्रेसचा आणि अभ्यासाचा आता काही संबंध उरलेला नाही. ते काहींच्या काही बोलत आहेत, त्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका. गेल्या चार पिढ्या आपला पक्ष अंधारात होता, कष्टाने देशात सर्वत्र सत्ता आली आहे. पक्ष मोठा होत असताना पक्षाचा वाईट काळ विसरून चालणार नाही.

२०१४  नंतर जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा बदललेली आहे. ब्रिटनला मागे टाकून जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था झालेलो आहोत, विकसित देशांपेक्षा भारतातील महागाईचा दर कमी आहे आणि विकासदर जास्त आहे. रेल्वे, मेट्रो, विमानतळ बांधून पायाभूत सुविधांचा विकास मोदी सरकारने केलेला आहे.

लोकांच्या आपल्याकडून खूप आशा आकांक्षा आहेत. कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद साधून त्यांना सरकारच्या योजना संदर्भात माहिती द्यावी, घरोघरी जाणारा कार्यकर्ता हा शांतपणे बोलणारा आणि लोकांचे ऐकून घेऊन त्यांना शांतपणे उत्तर देणारा असला पाहिजे. तो उद्धटपणे वर्तन करणारा किंवा त्यांच्या ऐकून घेणारा असू नये असा सल्ला यांनी दिला.

स्वतःच्या ताकदीवर निवडून यायचे

आगामी काळातल्या सर्व निवडणूक आपण जिंकणार आहोतच. पण विरोधकांच्या कमकुवतपणापेक्षा आपण आपली ताकद वाढवून त्या ताकदीच्या बळावर आपल्याला निवडून यायचा आहे. जर आयुष्यभर पक्षाचे काम करताना आपण पाच कार्यकर्ते पक्षाशी जोडू शकलो नाहीत तर कसे चालेल. येत्या वर्षभरात प्रत्येक कार्यकर्त्यांनी सर्व जाती धर्मातील दहा नवे कार्यकर्ते पक्षाशी जोडावेत असे आवाहन नड्ड यांनी केले.

नड्डा यांच्या भाषणातील म्हणाले....

- महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राचा विकास रोखणारी आणि भाजप शिवसेना युती म्हणजे महाराष्ट्राचा विकास करणारी हे लोकांना सांगा.

- तीस वर्षे गरिबी हटावचे राजकारण करून गरिबी वाढवणारे आता आम्ही काय केले हा प्रश्न विचारत आहेत.

- महाविकास आघाडीचा एक मंत्री जेलमध्ये आहे, एक जेलमधून बाहेर आले अशा लोकांशी आपण कशासाठी चर्चा करायची?

- काँग्रेस सोबत गेलो तर शिवसेना पक्ष बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते हे लोकांना सांगा.

- सावरकरांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT