chhagan bhujbal anjali damania esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : ''भुजबळांना भाजप ओबीसींचा देशव्यापी चेहरा बनवणार'', दमानियांचा नवीन गौप्यस्फोट

BJP will make Bhujbal the nationwide face of OBCs; Damania's new secret blast. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर जाणार असल्याचं ट्वीट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी आणखी एक गौप्यस्फोट केला.

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर जाणार असल्याचं ट्वीट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी आणखी एक गौप्यस्फोट करुन भाजप भुजबळांना ओबीसींचा देशव्यापी चेहरा बनवणार असल्याचं म्हटलं आहे.

'टीव्ही ९'शी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, मागील काही दिवसांपूर्वी मला एकाने सांगितलं होतं की, भाजप भुजबळांना ओबीसी फेस म्हणून प्रोजेक्ट करणार आहे. काल पुन्हा तेच कळलं आणि मला अतिशय व्यथित वाटलं. एकीकडे मनोज जरांगे हे साधे शेतकरी असून त्यांनी एवढा लढा दिला. मात्र भाजपला भुजबळांसारख्यांची गरज का पडावी? एक साधा ओबीसी नेते लढा देऊ शकला असता.. तसं न करता भ्रष्ट माणसाला भाजप मोठं करत आहे.

दमानिया पुढे म्हणाल्या, एकेकाळी भाजपनेच भुजबळांवर गंभीर आरोप केले होते. तेच आज त्यांना पक्षात घेऊ पाहात आहेत. जे लोक भाजपसोबत जातात त्यांना क्लिनचिट दिली जात आहे. शिखर बँकेच्या घोटाळ्यात अजित पवारांना क्लिनचिट आणि आणि रोहित पवारांची नऊ-नऊ तास चौकशी केली, असे प्रकार सुरु आहेत. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा पण सगळ्यांना समान न्याय द्या.. असं त्या म्हणाल्या.

अंजली दमानिया यांचं ट्वीट

भुजबळ भाजपच्या वाटेवर?

एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?

अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?

कुठे फेडाल हे पाप

दरम्यान, मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा सुरु केल्यानंतर भुजबळांनी त्यांना कडाडून विरोध केला. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे जरांगेंनी भुजबळांना अस्सल मराठवाडी भाषेत टार्गेट करायला सुरुवात केली. आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरींमध्ये भुजबळ पुन्हा चर्चेत आले. त्यातच ते आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT