Chandrakant Patil on Nitesh Rane google
महाराष्ट्र बातम्या

अटक झाली तरी भाजप नितेश राणेंच्या पाठिशी - चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना नेता संतोष परब (Santosh Parab Attack Case) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचं प्रकरण भाजप नेते नितेश राणे (BJP Leader Nitesh Rane) यांना चांगलंच भोवणार असल्याचं दिसतंय. याच प्रकरणी नितेश राणे यांना अटक होणार असल्याची शक्यता आहे. त्यावरूनच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी नितेश राणेंना पाठिंबा दर्शवला आहे.

राज्य सरकारने नारायण राणेंना अटक केली. त्याचं शेवटी काय झालं? त्यावेळी न्यायालयानं सरकारला झापलं. नारायण राणेंना दोन दिवसांत जामीन द्यावा लागला होता. सरकारला जे करायचं ते करू देत. नितेश राणे यांना अटक झाली तरी भाजप त्यांच्या पाठिमागे उभे राहील. लोकशाही अजूनही संपलेली नाही. त्यांना अटक केलीच तर न्यायालयात जाऊन दाद मागणार. नितेश राणेंसाठी भाजप समर्थ आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यता आला होता. याप्रकरणी हल्लेखोर सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. याचप्रकरणी नितेश राणे यांची देखील कणकवली पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली. पण, त्यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले असता ते गैरहजर होते. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी राणेंना शोधण्यासाठी मोहीम सुरू केल्याचं दिसतंय. त्यांनी नीतेश राणेंच्या घरीदेखील भेट दिली. पण, ते तिथंही उपस्थित नाही. त्यानंतर पोलिसांनी सिंधुदुर्ग, गोवा आणि मुंबईत नितेश राणेंना ताब्यात घेण्यासाठी फिल्डींग लावल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिस राणेंचा इतका शोध घेत असताना आता त्यांना अटक होणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, अधिवेशन काळात आमदाराला अटक करता येत नाही. तसेच महत्वाच्या प्रकरणात अटक करायची असल्यास विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, अजूनही विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली नाही. त्यामुळे हंगामी अध्यक्षांच्या परवानगीने अटक होणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT