Blood Donation Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात महारक्तदान शिबिर; वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा पुढाकार

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दररोज रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने नातेवाइकांची धावपळ सुरू आहे, तर काहींना वेळेवर रक्त मिळत नसल्यामुळे जीव गमवावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दररोज रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने नातेवाइकांची धावपळ सुरू आहे, तर काहींना वेळेवर रक्त मिळत नसल्यामुळे जीव गमवावा लागत आहे.

या परिस्थितीतून सावरण्यासाठी व सामाजिक जबाबदारी म्हणून वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएमओ) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. एकाच दिवशी राज्यातील ३५ ठिकाणी रक्तदान शिबिर झाले. यातून तीन हजार ७६५ रक्तपिशव्या संकलित केल्याची माहिती संघटनेचे मार्गदर्शक राज देशमुख यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा दिसून येत आहे. रुग्णालयातही रक्ताची कमतरता असल्यामुळे रक्ताची मागणी होत आहे. केवळ प्लाझ्माच नाही तर अपघात, शस्त्रक्रिया, थायलेसेमिया अशा इतर गोष्टींसाठी रुग्णांना रक्ताची गरज भासते. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिक रक्तदानासाठी येत नसल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीमध्ये रक्तपेढ्यांना रक्त संकलन करणे आव्हानात्मक झाले आहे. या समस्येला दूर करण्यासाठी डब्ल्यूएमओ संघटनेने राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये ३५ हून अधिक ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

सर्व शासकीय नियम पाळत, सोशल डिस्टन्सिंग ठेवून सर्व रक्तदान शिबिरे यशस्वीरीत्या पार पडले. ॲम्ब्युलन्स, व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड, इंजेक्शन उपलब्ध करून देणे आदी सेवाकार्यही संस्था करत आहे. रक्तदानामध्ये तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय होती. प्रत्येक शहरातील वेगवेगळ्या रक्तपेढींनी यासाठी सहकार्य केले. या वेळी पराग मते, अध्यक्ष प्रवीण पिसाळ आणि कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रक्तदान

कोथरूड १५०

कात्रज १८५

वाघोली १७५

हडपसर २४०

पिंपरी-चिंचवड ४४९

शिक्रापूर १४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT