bmc sakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गटात गेलेल्या 30 माजी नगरसेवकांच्या प्रभागात पाच-पाच कोटींचा निधी; 'मनपा'च्या आकस्मिकता निधीचे 'निवडक' लाभार्थी

मुंबई महानगर पालिकेच्या ३१ माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये १६३ कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याची माहिती पुढे आली आहे. पालिकेने विशेष ठराव करुन आकस्मिकता निधी वितरित केला आहे. विशेष बाब ही आहे की, ३१ पैकी ३० माजी नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबई महानगर पालिकेच्या ३१ माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये १६३ कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याची माहिती पुढे आली आहे. पालिकेने विशेष ठराव करुन आकस्मिकता निधी वितरित केला आहे. विशेष बाब ही आहे की, ३१ पैकी ३० माजी नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या अभ्यासामध्ये ९०० कोटींच्या आकस्मिकता निधीच्या वितरणाबाबत माहिती दिली आहे. यामध्ये ३१ माजी नगरसेवकांना प्रत्येकी पाच-पाच कोटी रुपये निधी दिलेला आहे. या निधी वाटपात भाजप-शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या व्यतिरिक्त इतरांवर सापत्नपणाची वागणूक दिल्याचे उघड झालेलं आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षाच्या १९६ नगरसेवकांना एका रुपयाचाही निधी दिलेला नाही. आकस्मिकता निधीतून एकीकडे ३० माजी नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी पाच-पाच कोटी रुपयांचा निधी दिलेला असताना दुसऱ्यांना मात्र वंचित ठेवण्यात आले.

कोणत्या नगरसेवकांना निधीचं वाटप

मागच्या काही महिन्यांमध्ये शिंदे गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले. यामध्ये कांग्रेसचे तीन नगरसेवक, ठाकरे गटाचे २१ नगरसेवक आणि काँग्रेसच्या सहा नगरसेवकांचा समावेश आहे. महानगर पालिकेने वाटप केलेल्या आकस्मिकता निधीचा लाभ या नगरसेवकांना मिळाला असून प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला.

विरोधी पक्षांच्या आमदारांवरही पालिकेकडून अन्याय

मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी 2023 च्या धोरणानुसार, प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त 35 कोटी रुपये दिला जाऊ शकतो. मुंबईतील 36 आमदारांपैकी 21 सत्ताधारी पक्षाच्या आदारांनी मागितलेला निधी त्यांना मिळाला मात्र, 15 पैकी 11 विरोधी आमदार अद्याप निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT