Bombay HC on Panchayat Member eSakal
महाराष्ट्र बातम्या

Bombay HC : तिसरं मूल सावत्र असल्यास पंचायत सदस्यत्व जाणार नाही; हायकोर्टाचा मोठा निर्णय!

Panchayat Member : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

Sudesh

Bombay HC Nagpur Bench : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी एक मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रात पंचायत सदस्यांसाठी दोन मुलं असण्याची मर्यादा ही केवळ त्यांच्या सख्ख्या मुलांपुरती मर्यादित आहे. सावत्र मुलांचा यात समावेश नसल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलं.

न्यायमूर्ती ए.ए. चांदुरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. खैरुनिसा शेख चांद नावाच्या महिलेच्या याचिकेवर निकाल जाहीर करत हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवले.

महाराष्ट्रातील कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीला दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास ती व्यक्ती ग्रामपंचायत किंवा पंचायत सदस्यत्वास अपात्र ठरते. तसंच सदस्यत्व मिळाल्यानंतर तिसरं अपत्य झाल्यास, सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतं. खैरुनिसा शेख चांद यांना तीन मुलं असल्यामुळे त्यांचं ग्राम पंचायत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. (Mumbai HC Decision)

याविरोधात खैरुनिसा यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांनी आपल्या याचिकेत सांगितलं, की त्यांचे पती शेख चांद यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत, तसेच आपल्यापासून केवळ एक मूल झालं आहे. खैरुनिसा यांचे वकील सुकृत सोहनी यांनी असा युक्तीवाद मांडला, की कायद्यातील 'दोन मुलांची' अट ही केवळ व्यक्तीच्या बायोलॉजिकल, म्हणजेच सख्ख्या मुलांना लागू होते.

याबाबत एक-सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. यानंतर महाराष्ट्र ग्राम पंचायत कायद्याच्या तरतुदींखाली वापरण्यात आलेली 'दोन मुले' ही व्याख्या सामान्य अर्थाने आहे, की केवळ सख्ख्या मुलांसंदर्भात आहे, याचं स्पष्टीकरण मागण्यासाठी हे प्रकरण विभागीय खंडपीठासमोर पाठवण्यात आलं.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील संगीता जाचक यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, की एखाद्या व्यक्तीला दोनपेक्षा अधिक सख्खी अपत्ये असल्यावरच ग्राम पंचायत कायद्याअंतर्गत सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतं.

कोर्टाने दिला निर्णय

याबाबत सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर विभागीय खंडपीठाने आपला निर्णय जाहीर केला. "एका पुरूष सदस्याच्या संदर्भात 'दोन मुले' व्याख्येमध्ये अशा सर्व मुलांचा समावेश असेल, ज्यांच्या जन्मासाठी तो जबाबदार आहे. यामध्ये मग त्याच्या पूर्वीच्या आणि/किंवा सध्याच्या विवाहातून जन्माला आलेली असली तरीही. महिला सदस्याच्या संदर्भात, तिने जन्म दिलेल्या सर्व अपत्यांचा समावेश असेल. यामध्ये मग ते तिच्या पूर्वीच्या किंवा सध्याच्या विवाहातून जन्माला आलेले असले तरीही." असं खंडपीठाने स्पष्ट केलं

यामुळेच 'दोन मुलं' ही व्याख्या केवळ त्या व्यक्तीपुरती मर्यादित आहे, ज्याला अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोबतच, ही व्याख्या केवळ त्या व्यक्तीच्या सख्ख्या मुलांपुरती मर्यादित आहे; असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT