सोलापूर : सोलापूरच्या सोने-चांदी बाजारात चांदीच्या भावाने ‘जीएसटी’सह सोमवारी (ता. २१) उच्चांक गाठला. एक लाख रुपये प्रति किलो चांदी, असा दराचा आकडा ओलांडला आहे.
चांदीच्या भाववाढीचे परिणाम आता पुढील काळात अधिक तीव्र होणार आहेत. उद्योगात वाढत्या वापरात आलेल्या चांदीचा फटका मात्र दागिन्यांसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसला आहे. त्यामुळे चांदी सायलेंट किलर ठरली आहे. आज (सोमवारी) सोलापुरात चांदीने सलग दुसऱ्या दिवशी एक लाख रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत चांदीच्या भावाने दीड हजार रुपयांनी उसळी घेत एक लाख रुपयांचा आकडा ओलांडला. सोलापूरच्या सोने- चांदी बाजारासाठी ही ऐतिहासिक घटना मानली जात आहे.
ठळक बाबी...
औद्योगीक वापरासाठी चांदीची वाढती खरेदी
ई- वेस्टच्या रिसायकलिंग प्रक्रिया होत नसल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूमधील चांदी परत बाजारात येत नाही
चांदीच्या भेटवस्तू खरेदीवर येणार मर्यादा
सौभाग्याचे अलंकार म्हणून पैंजण, तोडे, जोडवे, हळदीकुंकू करंडा आदीची खरेदी कायम
हौसेसाठी चांदीची खरेदी होणार कमी
सोलापुरातील चांदीच्या दरवाढीचा प्रवास
(प्रतिकिलो दर जीएसटीसह)
१२ ऑक्टोबर : ९७ हजार रुपये
१३ ऑक्टोबर : ९७ हजार रुपये
१४ ऑक्टोबर : ९७ हजार रुपये
१५ ऑक्टोबर : ९६ हजार ९०० रुपये
१६ ऑक्टोबर : ९७ हजार रुपये
१७ ऑक्टोबर ९७ हजार रुपये
१८ ऑक्टोबर : ९९ हजार रुपये
१९ ऑक्टोबर : ९९ हजार ५०० रुपये
२० ऑक्टोबर : ९९ हजार ५०० रुपये
२१ ऑक्टोबर : १ लाख एक हजार रुपये
चांदीची भाववाढ अनपेक्षित
पक्ष पंधरवड्यात चांदीचे भाव कमी होतील असे वाटले होते. पण प्रत्यक्षात चांदीचे भाव तेजीच्या दिशेने जात आहेत. त्याचा परिणाम ग्राहकी कमी होण्यावर असेल. भेटवस्तू म्हणून पूर्वी चांदीच्या वस्तू घेतल्या जात असत त्यावर मर्यादा येतील.
- प्रितीश वेदपाठक, सोनेचांदी व्यापारी, मरिआई चौक, सोलापूर
---------------------------------------------------------------------------------------------
युद्धजन्य स्थिती, औद्योगिक वापर ही कारणे
औद्योगीक वापरात विशेषतः ई व्हेईकलच्या बॅटरीत चांदीचा वापर वाढला आहे. त्यात वापरलेली चांदी रासायनिक अभिक्रियेत नष्ट होती पण तिचा पुनर्वापर होत नाही. त्यामुळे फक्त दागिन्यातील चांदी कायम वापरता येते किंवा ती वितळवून नव्याने दागिने करता येतात. युद्धजन्य स्थिती, औद्योगिक वापर ही कारणे महत्त्वाची ठरतात.
- मिलिंद पंडित, मिलिंद गोल्डस्मिथ, विजापूर रोड, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.