Latest Maharashtra News live Updates  esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. महाराष्ट्र राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे आणि अनिल देशमुख उपस्थित आहेत. बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात दाखल झाले आहेत. ते महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.

मुलुंड परिसरात १३ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

मुलुंड परिसरात १३ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ५० वर्षीय व्यक्तीने हे कृत्य केले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar Live: राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या नेतृत्वात महत्वाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वात थोड्याच वेळात सिल्वर ओक येथे पक्षांतर्गत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीतील चर्चेची माहिती जयंत पाटील शरद पवारांना देणार आहेत. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागांवरील वादावर चर्चा झाल्यानंतर ही बैठक होणार आहे.

Puja Khedkar live: खोटी साक्ष दिल्याप्रकरणी पूजा खेडकरकडे खुलासा मागितला

दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरकडून बायोमेट्रिक नमुने घेतल्याबद्दल खोटी साक्ष दिल्याबाबत UPSC च्या आरोपावर खुलासा मागितला आहे. अटकपूर्व जामिनासाठी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, UPSC ने पूजावर खोटी साक्ष दिल्याचा आरोप केला. तर, पूजा खेडकरच्या वकिलांनी UPSC ने दबाव टाकण्यासाठी जाणीवपूर्वक रणनीती आखल्याचा दावा केला आहे. न्यायालयाने २६ सप्टेंबरच्या सुनावणीपूर्वी खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

Mathura Train Accident : आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर ट्रॅक कोसळला; 42 गाड्यांचे मार्ग बदलले

आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर बुधवारी रात्री कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या २६ वॅगन्स रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात 500 मीटर रुळाचे नुकसान झालेय. ट्रॅकवरील 800 स्लीपरही तुटले. अपघातानंतर वंदे भारत, राजधानीसह ३४ गाड्या रद्द करण्यात आल्या. तर, 42 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.

Pune-Kolad Accident LIVE : पुणे-कोलाड रस्त्यावरील लवळे फाट्यावर अपघात, वाहनांचं नुकसान

पिरंगुट (ता. मुळशी) : येथील पुणे-कोलाड रस्त्यावर लवळे फाटा येथे आज सकाळी अपघात झाला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. येथील घाट उतरताना स्टील घेऊन चाललेल्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असून त्यात एक कार, एक टँकर आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे. .चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले. आज सकाळी आठ वाजता हा अपघात झाला.

Haryana News : दारूच्या दुकानात झालेल्या गोळीबारात तीन ठार, तर दोन जण जखमी

हरियाणा : सोनीपत रोडवरील बलियाना वळणावर एका दारूच्या दुकानात झालेल्या गोळीबारात तीन जण ठार, तर दोन जण जखमी झालेत. जखमींवर रोहतक पीजीआयच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

High Court LIVE : डॉ. रानडे यांची नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती

प्रसिद्ध अर्थतज्ञ व राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरील त्यांची नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली. नियमित खंडपीठ डॉ. रानडे यांचे सविस्तर म्हणणे ऐकून घेतले जाईल, तोपर्यंत नियुक्ती रद्दचा निर्णय ‘जैसे थे’ ठेवा, असे निर्देश न्यायालयाने संस्थेला दिलेत.

Apple चा iPhone 16 खरेदीसाठी मुंबईत 'ॲपल स्टोअर'च्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी

मुंबईतील बीकेसी भागामध्ये अ‍ॅपलचे स्टोअर आहे. भारतामधील हे पहिले स्टोअर असून येथे आज सकाळपासून आयफोन-16 खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रांग लावली आहे. राज्यातील विविध भागांमधून आयफोनप्रेमी मुंबईत दाखल झाले आहेत.

Amit Shah LIVE : अमित शहांचा २४ सप्टेंबरला कोल्हापूर जिल्हा दौरा शक्य

कोल्हापूर : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा हे मंगळवारी (ता. २४) कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, २३ सप्टेंबरला त्यांचा नागपूर दौरा निश्‍चित असल्याने कोल्हापूरचा संभाव्य दौराही आला आहे. या दौऱ्याचा कार्यक्रम आज (ता. २०) निश्‍चित होणार आहे.

PM Modi LIVE : पृथ्वीतलावरील कोणतीही शक्ती 370 वे कलम पुन्हा आणू शकत नाही; पंतप्रधान मोदींनी विरोधकांना ठणकावलं

Latest Marathi Live Updates 20 September 2024 : ‘जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही पाकिस्तानचा अजेंडा राबवू देणार नाही. या पृथ्वीतलावरील कोणतीही शक्ती ३७० वे कलम पुन्हा आणू शकत नाही,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना ठणकावलेय. कोल्हापुरात रस्त्यावर उभे राहण्याच्या कारणावरून भोईगल्लीतील दोन गटात जोरदार दगडफेक झालीये. त्‍यात चौघे जखमी झालेत. तर, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा हे मंगळवारी (ता. २४) कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे, त्यामुळे काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून यासह सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग' मध्ये नवा ट्वीस्ट; अखेर प्रतिमा बोलू लागली, आता सगळ्यांचं पितळ उघडं पडणार?

SCROLL FOR NEXT