Latest Maharashtra News live Updates esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Maharashtra News Updates : दोन सुवर्णपदके जिंकणारा गुकेश मायदेशी दाखल

सकाळ डिजिटल टीम

D Gukesh Live: दोन सुवर्णपदके जिंकणारा गुकेश मायदेशी दाखल

बुडापेस्ट इथं बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारतासाठी दुहेरी सुवर्णपदक जिंकल्यानंतर बुद्धिबळ ग्रँडमास्टर डी गुकेश चेन्नई विमानतळावर दाखल झाला आहे.

Pune Live News: पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल वर मिळणार पाणी आणि चहा

पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर पाणी आणि चहा मिळणार आहे. विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर आता हे मिळणार आहे.

Akshay Shinde Crime Live : अक्षय शिंदेचा मृतदेह जेजे रुग्णालयात पोहचला

अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयात पोहचली आहे. या ठिकाणी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

Mumbai Rain Live: पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात

पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील महिनाभरापासून पावसाने उसंत घेतली होती. मात्र पहाटेपासूनच आज मुंबई उपनगरात जोरदार पाऊस सुरू

Amit Shah Live : अमित शहा साधणार मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी (ता. २४) छत्रपती संभाजीनगरमध्ये येत असून, एमजीएम येथील रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ते मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Nagpur Live: नागपुरात मुसळधार पावसाला सुरवात

नागपुरात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. आज हवामान विभागकडून विदर्भात ऍलो अलर्ट दिला आहे.

Badlapur Case LIVE : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस गोळीबारात मृत्यू; बदलापूर रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मिठाईचे वाटप

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ठाण्यातील बदलापूर रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिठाईचे वाटप केले.

Badlapur Case Update : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस गोळीबारात मृत्यू, न्यायाधीशांच्या उपस्थितीत मृतदेहाचा केला पंचनामा

बदलापूर अत्याचाराचा आरोपी अक्षय शिंदे याचा काल बदलापूर, ठाणे येथे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. काल रात्री त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आले आणि आज सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत त्याचा पंचनामा करण्यात आला. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम जेजे रुग्णालयातील तज्ञ, तसेच फॉरेन्सिक टीम करतील.

Jammu and Kashmir Election LIVE : जम्मू-काश्मीरमधील सहा जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांसाठी उद्या मतदान, सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून चोख बंदोबस्त

उद्या, 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी राजौरी जिल्ह्यात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. जम्मू-काश्मीरमधील सहा जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे.

Badlapur Case Update : बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव

बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. तातडीचा दिलासा देण्यास नकार देत याचिकेवरील सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केलीये. सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर शाळेशी संबंधित दोन फरार आरोपींनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.

Mahabodhi Express LIVE : प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक; अनेक प्रवासी जखमी

प्रयागराज : काल रात्री रेल्वेवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीये. नवी दिल्लीहून बिहारमधील गयाकडे जाणाऱ्या महाबोधी एक्सप्रेस ट्रेनवर हल्लेखोरांनी दगडफेक केली. रात्री साडेनऊच्या सुमारास प्रयागराज जंक्शनहून गयाकडे निघालेल्या या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याचे कळतंय.

Mumbai University Senate Election LIVE : मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज (मंगळवार 24 सप्टेंबर) मतदान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं राज्याचं लक्ष लागलंय.

Mumbai Rain LIVE : मुंबई-ठाणे महामार्गावर पावसाचा जोर वाढला

राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला असून मुंबईच्या काही भागांतही जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई-ठाणे महामार्गावर पावसाला सुरुवात झालीये.

CM Siddaramaiah LIVE : 'मुडा' घोटाळाप्रकरणी आज निकाल शक्य; मुख्यमंत्र्यांच्या बाजूने निकाल येणार की विरोधात?

बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जागा वाटप प्रकरणात खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या याचिकेची सुनावणी संपली असून, आज (ता. २४) उच्च न्यायालय आपला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या बाजूने निकाल येणार की विरोधात, याबाबत तीव्र उत्सुकता निर्माण झाली आहे.

Governor C. P. Radhakrishnan LIVE : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी (ता. २५) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी ३ वाजता ते शासकीय विश्रामगृहात येतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता ते हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील.

Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस चकमकीत मृत्यू

Latest Marathi Live Updates 24 September 2024 : महिनाभरापूर्वी बदलापूर येथे शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. तसेच राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना गायीचे दूध पुरवणाऱ्या दूध उत्पादकांना आता पाचऐवजी सात रुपये अनुदान दिले जाणार आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी (ता. २५) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जागा वाटप प्रकरणात खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या याचिकेची सुनावणी संपली असून, आज उच्च न्यायालय आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत असून काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Encounter: आणखी एक एन्काउंटर! दोन जवानांची रेल्वेतून फेकून हत्या; एक लाखाचे बक्षिस असलेल्याला पोलिसांनी संपवले

शाब्बास पोरींनो! पुण्याच्या लेकीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चीनला नमवले अन् ऐतिहासिक पदक जिंकले

... म्हणून प्रसाद ओकने केलं स्वप्नील जोशीचं कौतुक; पोस्ट करत म्हणाला-

Work Stress Management : कुटुंब आणि ऑफिसमध्ये भरडले जाऊ नका, असं करा नियोजन कामाचा ताप होणार नाही

F&O Traders: फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करताय सावधान! गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदारांचे 1.81 लाख कोटी पाण्यात

SCROLL FOR NEXT