Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहिण' बरोबरच 'लाडका भाऊ' योजना पण आणा; ठाकरेंचं सरकारला आवाहन

मध्य प्रदेशातील 'लाडली बहन' योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'लाडकी बहिण' योजनेची घोषणा सरकारनं केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मध्य प्रदेशातील 'लाडली बहन' योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'लाडकी बहिण' योजनेची घोषणा सरकारनं केली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे ट्रान्सफर केले जातात.

याच योजनेच्या धर्तीवर राज्यात योजना लागू होणार आहे. पण केवळ लाडकी बहिण योजनाच नको तर लाडका भाऊ योजना देखील आणा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. (Bring Ladka Bhau scheme along with Ladki Bahin Yojna Uddhav Thackeray appeal to Maharashtra Government)

ठाकरे म्हणाले, लाडकी बहिण योजना तुम्ही आणत असाल तर मी त्याचं स्वागत करतो. पण लाडका भाऊ अशी योजना पण आणा. जसं माझ्या माता-भगिनींना तुम्ही लाभ देता तसंच माझ्या भावांना देखील तुम्ही लाभ मिळवून द्या. आता तो जुना काळ गेला, आता महिला देखील कर्तुत्ववान आणि सक्षम झालेल्या आहेत. जसं घराचा कर्ता पुरुष असतो तशाच आता महिला देखील घराच्या कर्त्या झालेल्या आहेत. त्यामुळं महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना दोघांसाठी तुम्ही आणा.

दरम्यान, आत्तापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत सरकारनं जे आश्वासनं दिलं होतं चंद्रकांतदादांनी ते आज मला चॉकलेट देऊन गेले होते. तसंच योजनांची चॉकलेटं तुम्ही देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता संपलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमुळं आता त्यांना याची गोडी राहिलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT