Buldhana Bus Accident Sakal
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Bus Accident : दारूने घेतला २५ निष्पापांचा बळी? बुलढाणा अपघातात मोठी अपडेट आली समोर

रोहित कणसे

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडलं होतं. ३० जून आणि १ जुलै रोजीच्या मध्यरात्री झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आता या अपघातात मोठी अपडेट समोर आली आहे. हा अपघात चालकाने मद्यपान केल्याने झाल्याची शक्यता समोर आली आहे. फॉरेन्सिक चाचणीत रक्तात ३० टक्के अधिक मद्य आढळल्याचे समोर आले आहे.

या भीषण अपघातात २५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर सरकारच्या वेगवेगळ्या यंत्रणांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. यादरम्यान अमरावती येथील रिजनल फॉरेन्सीक सायन्स लॅबोरटरी ने याबद्दलचा तपास केला आहे. या संस्थेच्या अहवालात अपघाताच्या वेळे दरम्यान चालकाच्या रक्तामधील मद्याचे प्रमाण हे मान्य क्षमतेपेक्षा ३० टक्के जास्त असल्याचे समोर आले आहे.

या रिपोर्टमुळे बसचा चालक शेख दानिश हा दारू पुऊन बस चालवत होता अशी शक्यता समोर आली आहे. याच्या पूर्वी देखील एका खासगी संस्थेच्या रिपोर्टमध्ये बसचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची शक्यता फेटाळून लावण्यात आली होती. त्यामुळे मानवी चुक आणि हयगय केल्याने हा अपघात झाल्याचे समोर येत आहे.

दरम्यान समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना पाच लाख रुपये देऊन हा प्रश्न सुटणार नाही. अपघात थांबविण्यासाठी महामार्ग नियोजनाची माहिती असलेल्या देशातील तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी. कुठे व कशामुळे चूक झाली? हे शोधून काढावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: राज्यात नेमकं चाललंय काय? वांद्रे परिसरात १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; एकाला अटक, दुसरा फरार

Latest Maharashtra News Updates : राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करा; भाजप नेत्याच्या याचिकेवर आज सुनावणी

PAK vs ENG 1st Test : ‘Root’ मजबूत! इंग्लंडच्या जो रूटने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; टॉफ फाईव्हमध्ये एकही भारतीय नाही

Jalebi History: भारतात जिलेबी आली कशी अन् नाव कसे पडले? राहुल गांधींच्या वक्तव्यावरून चर्चेत आलेल्या जिलेबीचा इतिहास काय?

Thane Politics: ठाण्यात भाजपमध्ये होणार बदल? इच्छुकांची मांदियाळी, भूमिपुत्रांना संधी देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT