buldhana bus accident Sakal
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Bus Accident: महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग; ‘समृद्धी’वर अपघातांचं सत्र सुरूच

११ डिसेंबर २०२२ २० मार्च २०२३ या कालावधीत या महामार्गावर झालेल्या अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

वैष्णवी कारंजकर

बुलढाणा इथं समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अपघाताची पूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. मागच्याच वर्षी  सुरू झालेल्या या महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. आत्तापर्यंत या महामार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 मागच्या वर्षी ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी भागाचं उद्घाटन झालं. तेव्हापासून पहिल्या १०० दिवसांमध्ये याठिकाणी अंदाजे ९०० अपघात झाल्याचं महाराष्ट्र सरकारच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे.  न्यूज १८ लोकमतने ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार ११ डिसेंबर २०२२ ते २० मार्च २०२३ या कालावधीत या महामार्गावर झालेल्या अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री झालेल्या अपघातातही २६ जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजाजवळ हा अपघात झाला आहे. आत्तापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांपैकी काही प्रमुख अपघातांची माहिती घेऊयात...

१.    १२ मार्च २०२३ – लोणार तालुक्यातल्या शिवणी पिसाजवळ झालेल्या या अपघातात सहा जण जागीच ठार झाले होते. तर सहा जण जखमी झाले होते. हा या महामार्गावरचा सर्वात मोठा अपघात मानला जात होता. वेगात आलेली चारचाकी गाडी दुभाजकाला धडकून पलटी मारल्याने हा अपघात झाला.

२.    मार्च महिन्यात आपल्या काकांच्या अंत्यविधीला तेलंगणला गेलेलं कुटुंब सूरतला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात तिघे जागीच ठार झाले तर एकजण उपचारावेळी मृत्यूमुखी पडला. छत्रपती संभाजीनगरमध्ये करमाड शेकटा गावाजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला होता.

३.    ७ मार्च २०२३: लासूर स्टेशन इथल्या हडस पिंपळगाव जवळ शिर्डीवरून नागपूरला जाणाऱ्या स्विफ्ट कारला ट्रकने दिलेल्या धडकेत तीन जण जागीच ठार झाले. यात पती पत्नी आणि लहान मुलाचा समावेश आहे. तर आणखी दोन मुलं जखमी झाली.

४.    २२ जानेवारी २०२३: धामणगाव परिसरात झालेल्या या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर चार जण जखमी झाले. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

५.    नुकताच बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजाजवळ झालेला अपघात आत्तापर्यंतचा या महामार्गावरचा सर्वात मोठा अपघात मानला जात आहे. नागपूरमधून पुण्याला जाणाऱ्या लक्झरी बसच्या झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ प्रवासी बाहेर पडले आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT