Buldhana Bus Accident Sakal
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताला रोड हिप्नोसिस जबाबदार? जाणून घ्या नक्की काय झालं...

बुलढाणा इथं मध्यरात्री झालेल्या खासगी बस अपघाताच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या अपघातामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

वैष्णवी कारंजकर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघाताची सध्या सोशल मीडियासह राज्यभरात चर्चा सुरू आहे. या अपघातामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत, त्यापैकी रोड हिप्नोसिस हे एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे.

रोड हिप्नोसिस ही संकल्पना यापूर्वीही चर्चेत आली होती. सायरस मिस्त्री आणि विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यावेळी या विषयाची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. बुलढाणा इथं मध्यरात्री झालेल्या खासगी बस अपघाताच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या अपघातामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कसा झाला हा अपघात?

काल मध्यरात्री हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ एका खासगी बसचा अपघात झाला. या भीषण अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. पुढच्या दोन चाकांनी पेट घेतला. त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडीला आग लागल्याची माहिती मिळत आहे

बुलढाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमधल्या ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या बसचा चालक या अपघातातून वाचला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, बसचा टायर फुटल्याने बस पलटी झाली आणि त्यानंतर बसला आग लागली. टायर फुटणे हेच अपघाताचं मुख्य कारण असल्याचं पोलिसांनीही स्पष्ट केलं आहे.

रोड हिप्नोसिस म्हणजे काय?

अशा पद्धतीच्या अपघातांच्या मागे स्लिप हिप्नोसिस, हायवे हिप्नोसिस असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काय आहे ही संकल्पना?

चालक जेव्हा खूप वेळापर्यंत गाडी चालवतो, त्यावेळी चालकाला हायवे हिप्नोसिसचा सामना करावा लागू शकतो. साधारण अडीच ते तीन तास सलग गाडी चालवल्यानंतर या समस्येचा सामना करावा लागतो. यामध्ये चालकाचे डोळे उघ़डे असतात, पण त्याचं डोकं चालत नसतं.

समजा ड्रायव्हरचा अपघात झाला तर सुमारे 15 मिनिटे मन सुन्न राहते आणि त्यांना काहीच वाटत नाही. अशी परिस्थिती टाळण्यासाठी वाहनचालकाने दोन ते अडीच तास चालल्यानंतर ब्रेक घेत राहावे. हायवे हिप्नोसिसमुळे अनेक वेळा रस्ते अपघातही घडतात. हायवे हिप्नोसिस अवस्थेत मेंदू कार्यक्षम राहत नाही. सोप्या भाषेत समजावून सांगितल्यास तो निष्क्रिय होतो. ड्रायव्हरची गाडीवर पकड असते, पण तो त्याच्या आजूबाजूचे सर्व काही विसरतो. याच कारणामुळे अनेकवेळा ड्रायव्हरचे वळण चुकते आणि मन पुन्हा अ‍ॅक्टिव्ह मोडवर आल्यावर त्याचीही जाणीव होते.

हिप्नोसिस अवस्थेत व्यक्तीला आपण काय करतोय किंवा कोणत्या अवस्थेत आहे याची जाणीव नसते. यामध्ये डोकं पूर्णपणे सुन्न होते.

हायवे हिप्नोसिस निर्जन रस्त्यावर किंवा रात्रीच्या वेळी अधिक सामान्य आहे. वाहनात एकटे असताना, चालकाचा वेग अनेकदा वाढतो आणि काहीवेळा वाहन ताशी १००, १२० किमीपेक्षा जास्त वेगाने चालवू लागते. अशा स्थितीतही डोकं सुन्न होऊन जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT