Bus stand renovation through MIDC news esakal
महाराष्ट्र बातम्या

ST Bus News: ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून बसस्थानकांचे रुपडे बदलणार

राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या बसस्थानकांचा कायापालट एमआयडीसीच्या माध्यमातून होणार आहे.

प्रशांत बैरागी

ST Bus News : राज्यातील ग्रामीणसह शहरी भागातील अनेक बसस्थानकांत अनेक प्रकारच्या गैरसोयी, अस्वच्छता, मोकाट जनावरांचा वावर असल्याने अक्षरशः कचराकुंडीसारखी अवस्था झालेली दिसते.

आगामी काळात उद्योग व्यवसायांचा कायापालट करणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाच्या पुढाकारातून राज्यातील बसस्थानके चकाचक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत सुमारे ६०० कोटींचा सामंजस्य करारही झाला आहे. शासन निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले असून, एमआयडीसीकडून गुणवत्तापूर्ण कामाची नागरिकांना अपेक्षा आहे. (Bus stand renovation through MIDC news)

राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या बसस्थानकांचा कायापालट एमआयडीसीच्या माध्यमातून होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यातील १९३ बसस्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण होणार आहे.

यासाठी एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार नुकताच झाला. राज्यात एसटी महामंडळाची ६०९ बसस्थानके आहेत. त्यापैकी सध्या ५६३ बसस्थानके कार्यरत आहेत.

बसस्थानक परिसरातील खड्डे, पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. एसटी बसचेदेखील यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे आगामी काळात बसस्थानकांच्या सर्वांगीण विकासासाठी एमआयडीसीचा परिसस्पर्श लाभणार आहे.

पहिल्या टप्प्यात १९३ बसस्थानके

पहिल्या टप्प्यात एमआयडीसी १९३ एसटी बसस्थानकांच्या काँक्रिटीकरणासाठी ५०० कोटी रुपये व रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती करण्याची १०० कोटी रुपये खर्चाची निविदाप्रक्रिया राबविणार आहे. यातून लवकरच या सर्व बसस्थानकांचा कायापालट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT