Cabinet Expansion  
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion : तिसऱ्या भिडूमुळे खातेवाटपात थोडी गडबड, पण...; गुलाबराव पाटलांची सूचक कबुली

सकाळ डिजिटल टीम

जळगाव - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तार सर्वाधिक चर्चीला गेलेला विषय आहे. मात्र अजुनही याला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच खातेवाटपाबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी थोडी गडबड असल्याची कबुली दिली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, आज उद्यामध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, मी त्यासाठीच थांबलो होतो, मात्र नाशिक येथील वणी गडावरील अपघाताची घटना घडली. त्यामुळे मला नाशिक यावं लागलं. मात्र आज दुपारपर्यंत किंवा सकाळपर्यंत मंत्री मंडळाचा विस्तार होईल असं मी ऐकतो आहे, असं पाटील यांनी म्हटलं.

अजित पवार यांना अर्थ खातं मिळेल का, यावर पाटील म्हणाले की, कुणाला काय खात मिळेल हा निर्णय वरिष्ठ ठरवतील. परंतु, तिसरा भिडू आल्यामुळे खातेवाटपात थोडी गडबड होणार आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, खातेवाटपावरुन एकमेकांमध्ये नाराजी राहिल, असही त्यांनी नमूद केलं. तसेच अर्थ खात्याच्या बाबतीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहिलं. मात्र तीन पार्टनर झाल्यामुळे थोडा विलंब होतोय, हे निश्चित, असंही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Government : मणिपूरचे राज्य सरकार अल्पमतात? ‘एनपीपी’ने पाठिंबा काढून घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाचा दावा

IPL Mega Auction 2025: 'हे' ५ अनकॅप गोलंदाज होऊ शकतात करोडपती, फ्रँचायझींची असेल नजर

Tirupati Temple : तिरुपती मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना कामास बंदी; ‘टीटीडी’ ट्रस्टच्या बैठकीत निर्णय

Sports Bulletin 19th November: दिल्ली कॅपिटल्सने रिटेन न करण्यावर ऋषभ पंतने सोडलं मौन ते रॉजर फेडररचं राफेल नदालला भावनिक पत्र

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

SCROLL FOR NEXT