Cabinet Expansion Marathi News Cabinet Expansion Marathi News
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात लागू होणार गुजरात पॅटर्न; मंत्रिमंडळ विस्तारावरून चर्चा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला तीन आठवडे उलटून गेले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झालेला नाही. यामुळे महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू (Gujarat Pattern) होऊ शकतो, असे बोलले जात आहे. यामुळेच आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपरिषदेत वाटा देण्याची चर्चा आहे. मात्र, या नेत्यांनी अद्याप भाष्य केलेले नाही. (Cabinet Expansion Marathi News)

मंत्रिमंडळ स्थापनेत (Cabinet Expansion) भाजप नेतृत्व गुजरात पॅटर्न (Gujarat Pattern) लागू करू शकते, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. गुजरातमध्ये गेल्यावर्षी विजय रूपानी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर मंत्रिपरिषद बदलण्यात आली होती. त्यात उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह वरिष्ठांना स्थान दिले नाही. असाच फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू करून जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या लोकांना स्थान दिले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

अशा स्थितीत महाराष्ट्र भाजपचे दिग्गज नेते मौन घेऊन आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. मंत्रिमंडळात जाण्यासाठी उत्सुक असलेले पक्षाचे नेते अजूनही गप्प आहेत. भाजप असो वा शिंदे गटाचे आमदार सगळेच शांत आहेत. सर्व नेते केंद्राचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.

उघडपणे कोणीही बोलत नाही

मंत्रिमंडळ विस्तारात ‘गुजरात पॅटर्न’ लागू करण्याची चर्चा आहे. वरिष्ठ नेते कोणतीही रिक्स घ्यायला तयार नसल्याचे बोलले जात आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील हे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, आम्ही मंत्री होणार, असे उघडपणे कोणीही सांगत नाही.

फडणवीसांचा उनुभव डोळ्यासमोर

शिंदे गट व देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आपण सरकारमधून बाहेर पडणार असून, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले होते. काही वेळानंतर पक्षनेतृत्वाच्या दबावाखाली त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. यामुळेच गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच नेते कोणतीही जोखीम न पत्करून गप्प आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT