Cabinet Expansion esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत थोड्याच वेळात बैठक; मुख्यमंत्र्यांसह फडणवीस, पवारही उपस्थित राहणार

संतोष कानडे

मुंबईः उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. त्या अनुषंगाने आज रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक संपन्न होणार आहे.

रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्य्मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे होणार बैठक आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप या विषयांवर महत्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार तसेच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यातील कोणत्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? अशा सर्वच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. सुरुवातीला अजित पवारांचं बंड यशस्वी होतं की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आता त्यांच्याकडे संख्याबळ असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा पक्षबांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत.

सध्या अजित पवार गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांना अद्याप खाते मिळालेले नाही. उद्या उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या आमदारांना मंत्रिपदाचं गिफ्ट मिळू शकतं. त्या अनुषंगाने रात्री उशिरा बैठक पार पडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT