maratha reservation battle political interference manoj jarange patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंबंधी मोठा निर्णय; संदीप शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला, हैदराबाद गॅझेटचं काय?

संतोष कानडे

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला आहे. मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी या समितीची नियुक्ती सरकारने केली होती.

शिंदे समितीने आपला पहिला अहवाल १८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारकडे सुपूर्द केला होता. त्या नोंदीच्या आधारावर राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आणखी नोंदी शोधण्यासाठी सरकारने समितीला मुदतवाढ दिली होती.

सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये तब्बल ३८ निर्णय घेण्यात आलेले आहेत. आचारसंहिता तोंडावर असताना सरकारने अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतल्याचं दिसतंय.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. या समितीने मराठवाड्यासह महाराष्ट्रात दौरे केले, जुने दस्तावेज शोधले आणि आपला अहवाल सादर केला. त्यावरुन ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं.

या नोंदीमुळे मोजक्याच लोकांना आरक्षणाचा लाभ होतोय, असं म्हणत मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर दबाव कायम ठेवला होता. त्यामुळे सरकारने शिंदे समितीला वाढीव मुदत दिली होती. या समितीने आणखी पुरावे शोधून एक अहवाल सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सरकारकडे सादर केला आहे. हा अहवाल दुसरा आणि तिसरा असल्याचं सांगितलं जातंय.

हैदराबाद गॅझेटचं काय?

शिंदे समितीने अहवाल सादर केला आहे, मात्र तो नेमका कुठला आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हैदराबाद गॅझेट लागू करावं, अशी जरांगेंची मागणी आहे. त्यासाठी मंत्री शंभुराज देसाई यांनी जरांगेंना शब्दही दिला होता. त्यानुसार समितीने हैदराबाद येथे जाऊन कागदपत्र तपासल्याची माहिती आहे. सोमवारी सादर केलेल्या अहवालामध्ये हैदराबाद गॅझेटचा समावेश आहे की नाही? हे स्पष्ट नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Sabha Election 2024: सुमारे 100 जागांसाठी तब्बल 1,688 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसचा भाव वधारला

गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या सरकारचा निर्णय, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

Dharavi: विरोध, गोंधळ अन् कारवाई; अखेर धारावीतील 'त्या' मशिदीचा वादग्रस्त भाग समितीच्या लोकांनी पाडला

IND vs BAN 2nd Test: चूक झाली भावा! Virat Kohli संतापलेला पाहून Rishabh Pant ने मारली मिठी Video

Anupam Kher: १.३० कोटींच्या नोटांवर गांधींऐवजी अनुपम खेर यांचा फोटो, गुजरातमध्ये मोठा स्कॅम उघडकीस

SCROLL FOR NEXT