cabinet meeting Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Meeting : आता ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणे पडणार महागात! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

रोहित कणसे

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या निर्णयाची यादी शेअर करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद करण्यात आल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

यासोबतच संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना, जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळ निर्णयाची संपूर्ण यादी

✅ राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ

✅ महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार

✅ दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन

✅ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार

✅ टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व अनिल भाऊ बाबर यांचे नाव

✅ पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार; सिल्लोड मधील जमिनीला सिंचन

✅ प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद

✅ राज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांचा रकमेत वाढ

✅ राज्यातील आणखी १०४ आयटीआय संस्थांचे नामकरण

✅ संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार

✅ लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण

✅ कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या

✅ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

✅ राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र

✅ जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

✅ महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ

✅ आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार

✅ बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल

✅ कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय

✅ महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार

✅ कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव

✅ बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे

✅ गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार; २६०४ कोटीस मान्यता

✅ राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार. १ लाख ६० हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित

✅ उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन

✅ राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण

✅ शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार

✅ बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना

✅ सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार

✅ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार

✅ डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना

✅ वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी

✅ रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये देशातील सर्वात मोठी नक्षलवादी चकमक! आतापर्यंत 30 नक्षलवादी ठार; शस्त्रसाठा जप्त

Virender Sehwag Son: भले शाब्बास! सेहवागच्या लेकाने गाजवला पदार्पणाचा सामना, दिल्लीला मिळवून दिला शानदार विजय

NIAचे महासंचालक ते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ अशी ओळख; आता हे निवृत्त IPS अधिकारी BCCI मध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी

Womens T-20 world cup स्पर्धेपूर्वी रोहित शर्माने घेतली भारतीय खेळाडूंची भेट, हरमनप्रीत, स्मृती, जेमिमासोबतचा Video Viral

SCROLL FOR NEXT