Adv. Yashomati Thakur e sakal
महाराष्ट्र बातम्या

महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यात सध्या कोरोनाचं (Corona) सावट गडद झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील नियम कडक करण्यात आले आहेत. एकीकडे ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटचा धोका आहे तर दुसरीकडे थर्टी फर्स्टमुळे लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध सध्या वाढवण्यात आले आहेत. दुसरीकडे आणखी एक चिंतेची बाब म्हणजे राज्यातील अनेक नेते सध्या कोरोना पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. कालच राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे असे अनेक नेते कोरोना संक्रमित आढळले आहेत. त्याच नेत्यांच्या यादीत आता आणखी एका नेत्याची भर पडली आहे.

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT