Prakash Ambedkar sakal
महाराष्ट्र बातम्या

‘वंचित’चे उमेदवार जाहीर! माढा मतदारसंघातून रमेश बारस्कर तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी

वंचित बहुजन आघाडीने दुसऱ्या टप्प्यातील राज्यातील ११ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये मोहोळचे माजी नगराध्यक्ष व ओबीसी नेते रमेश बारसकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून तर अक्कलकोट तालुक्यातील राहुल गायकवाड यांना सोलापूरमधून उमेदवारी मिळाली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून मारुती जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रमोद बोडके,

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने दुसऱ्या टप्प्यातील राज्यातील ११ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये मोहोळचे माजी नगराध्यक्ष व ओबीसी नेते रमेश बारसकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून तर अक्कलकोट तालुक्यातील राहुल गायकवाड यांना सोलापूरमधून उमेदवारी मिळाली आहे. सातारा लोकसभा मतदार संघातून मारुती जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भातील आज घोषणा केली आहे. माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस व धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांनी आठ दिवसांपूर्वी या पदाचा राजीनामा दिला आहे. माढ्यामध्ये ओबीसी महासंघाच्या वतीने झालेल्या मेळाव्याचे निमंत्रक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन ॲड. आंबेडकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी चेहरा म्हणून बारसकर यांना संधी दिली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले राहुल गायकवाड हे अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते हे बाहेरचे असल्याचा आरोप सध्या काँग्रेसच्या वतीने सुरू आहे. भाजपने स्थानिक उमेदवार दिला नाही, अशी चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील स्थानिक युवा उमेदवार म्हणून ॲड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गायकवाड यांना संधी दिल्याचे दिसते.

‘वंचित’ची २०१९ मध्ये दमदार कामगिरी, आता...

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर हे स्वत: मैदानात उतरले होते. या निवडणुकीत ते स्वत: तर माढ्यातून ॲड. विजयराव मोरे निवडणूक लढले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दीड लाखांहून अधिक मते ॲड. आंबेडकर यांनी घेतली होती. तर माढ्यातून ॲड. मोरे यांनी 55 हजारांच्या आसपास मते मिळविली होती. आता होणाऱ्या या निवडणुकीत ‘वंचित’ची कामगिरी कशी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT