आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण इथं अपघात झाला आहे.
फलटण शहर : नागपुरातील अधिवेशन (Nagpur Winter Session) आटोपून पुण्यातून माण इथं जात असलेल्या आमदार जयकुमार गोरे यांची गाडी बाणगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याने आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासह अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.
ड्रायव्हरला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळं वेगानं असलेली गाडी पुलाचे संरक्षक असलेली ग्रील तोडून सुमारे साठ ते सत्तर फूट नदीच्या पात्रात कोसळली. पहाटे सव्वा तीनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात जखमी झालेले आमदार जयकुमार गोरे यांना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनी तातडीनं पुण्यात उपचारासाठी हलविले आहे.
गाडीत असणारे त्यांचे पीए रुपेश साळुंखे, चालक कैलास दडस यांना बारामती इथं तर बॉडीगार्ड जनार्दन बनसोडे यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सदर अपघाताचं वृत्त समजताच घटनास्थळी पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिलीय.
दरम्यान, या अपघाताबाबत आमदार गोरेंच्या कार्यालयातून फेसबुक पोस्टव्दारे माहिती देण्यात आलीये की, आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण इथं अपघात झाला असून त्यातून ते सुखरूप बचावले आहेत. आता त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे. गाडीतील इतर लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांची प्रकृती बरी आहे. सध्या पुण्यातील रुबी हॉल इथं उपचार घेत असून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व कुटुंबीय त्यांच्या बरोबर आहेत, असं स्पष्ट केलंय.
सकाळी सहा वाजता आमदार गोरेंना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून संपूर्ण टीमनं तातडीनं त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. सुदैवानं त्यांना जास्त दुखापत झाली नाहीये ते शुद्धीवर आहेत. गोरे बोलत देखील आहेत. जयकुमार गोरे यांना कुठलीही मोठी दुखापत झाली नाहीये. त्यांचे पल्स आणि बीपी व्यवस्थित असून गोरेंच्या छातीला थोडासा मार लागला आहे, असं रूबी हॉस्पिटलचे डॉ. कपिल झिरपे यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.