Praniti Shinde Canva
महाराष्ट्र बातम्या

‘शहर मध्य’च्या आमदारांकडे नगरसेवकांसाठी नाही वेळ! काँग्रेसविरूध्द राष्ट्रवादीचीच रणनिती

आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक साधत तिन्हीवेळेला मातब्बर नेत्यांना पराभवाची चव चाखायला लावली. पण, आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणापासून निवृत्ती घेतल्यानंतर ही घडी विस्कटू लागली असून विरोधक आता आमदार प्रणितींच्या पराभवासाठी एकजूट करू लागले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक साधत तिन्हीवेळेला मातब्बर नेत्यांना पराभवाची चव चाखायला लावली. पण, आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणापासून निवृत्ती घेतल्यानंतर ही घडी विस्कटू लागली असून विरोधक आता आमदार प्रणितींच्या पराभवासाठी एकजूट करू लागले आहेत. त्यात विशेषत: राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपनेही त्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. अनेकांनी काँग्रेसला हात दाखविला तर काहीजण पक्षांतराच्या तयारीत आहेत. तरीपण, स्वत:चा बालेकिल्ला मजबूत ठेवण्यासाठी आमदार प्रणिती शिंदेंचे प्रयत्न दिसत नाहीत, हे विशेष. काँग्रेसचे बहुतेक माजी नगरसेवक, पदााधिकारी ‘ताईं’चा वेळ मिळत नसल्याची चर्चा करीत पक्षांतराच्या गोष्टी करू लागल्याचीही चर्चा आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात माजी आमदार दिलीप माने यांच्यासह ॲड. यु. एन. बेरिया, सुधीर खरटमल, रियाज हुंडेकरी, तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, फिरदोस पटेल, श्रीदेवी फुलारे, चेतन नरोटे, प्रविण निकाळजे, नलिनी चंदेले, आरिफ शेख, संजय हेमगड्डी, अंबादास करगुळे अशा अनेक नगरसेवकांचा हातभार होता. पण, आता माने, खरटमल, बेरिया, चंदेले, फुलारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे बहुतेक नगरसेवक राष्ट्रवादीच गेले आहेत. भाजपनेही आमदार प्रणितींच्या पराभवासाठी कंबर कसली असून आता एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना पण या मतदारसंघात काम करीत आहे. एमआयएमने देखील त्याठिकाणी जम बसवला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसची घडी विस्कटू लागली आहे. आमदार प्रणिती शिंदे आम्हाला वेळ देत नाहीत, अशी चर्चा नगरसेवकांमध्ये सुरु आहे. त्यांना राज्याची कार्याध्यक्ष म्हणून विविध जिल्ह्यांमध्ये फिरावे लागते, पण स्वत:च्या मतदारसंघात त्यांना अधिक लक्ष द्यावा लागेल, हे निश्चित.

ताईंची हॅट्रिक, पण मताधिक्यात घट

जाईजुई विचारमंचच्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या प्रणिती शिंदेंना २००९ मध्ये पहिल्यांदा आमदारकीची संधी मिळाली. त्यावेळी नवख्या प्रणिती शिंदे यांनी कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांना आणि शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे यांना पराभूत केले. त्यावेळी प्रणिती शिंदे यांना तब्बल ६८ हजार २८ मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत एकीकडे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नवख्या उमेदवाराने (ॲड. शरद बनसोडे) खासदारकीला पराभव केला. तरीपण, मोदी लाटेत आमदार प्रणिती शिंदे यांनी जवळपास ४७ हजार मते मिळवत भाजपच्या मोहिनी पत्की व महेश कोठे, एमआयएमचे तत्कालीन नेते तौफिक शेख यांचा पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झालेला असतानाही आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्यमधून ५१ हजार ४४० मते घेत माजी आमदार आडम मास्तर, दिलीप माने, महेश कोठे, एमआयएमचे फारूख शाब्दी यांचा पराभव केला. पण, आता परिस्थिती व काळ बदलला असून आगामी निवडणुकीतील विजयासाठी त्यांना मतदारसंघात अधिक वेळ द्यावच लागेल, ही वस्तुस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT