मुंबई : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार (central Government) सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाज (underprivileged people) घटकांवरचे अत्याचार (victimization) वाढले आहेत. या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला (Ambedkar movement) नक्षलवादी चळवळ (naxalite movement) ठरवून बदनाम करण्याचे पाप केले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचा पदग्रहण पार पडला त्या सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी पटोले यांच्या सोबत राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, आमदार राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरु आहे. सर्व काही खाजगीकरण करुन आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. शेतकरी, कामगार, तरुण वर्गाला संपवण्याचे काम केले जात आहे. बाबासाहेबांचा विचार टिकला तरच देश वाचेल त्यासाठी आंबेडकरांचा विचार, काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवा. देशात परिवर्तन घडेल तर ते महाराष्ट्रातूनच आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी जोमाने काम करा, असे आवाहन यावेळी पटोले यांनी केले.
यावेळेस बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे म्हणाले की, या पदाचा वापर मी राज्यातील मागासवर्गीय विभागातील वंचितांचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी करणार आहे. आज आपल्या देशात मागासवर्गीय विभागातील वंचित जनतेवर अन्याय होत असल्याचे आपल्याला दिसून येते. या अन्यायाचे निवारण करण्यासाठी मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात हेल्पलाईन सुरू करणार आहे. ज्या ज्या ठिकाणी वंचितांवर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी हेल्पलाईनच्या माध्यमातून पोहचून वंचितांना न्याय देण्याचे काम मी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.