TET exam esakal
महाराष्ट्र बातम्या

‘टीईटी’ची प्रमाणपत्रे आता गोपनीय संस्थेकडून! १० नोव्हेंबरला ‘टीईटी’; ३.५३ लाख भावी शिक्षकांची नोंदणी, परीक्षा केंद्रांवर CCTV; ‘टीईटी’ व ‘टेट’ म्हणजे काय? वाचा...

महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या माध्यमातून १० नोव्हेंबरला ‘टीईटी’ घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना निकालाची प्रमाणपत्रे आता परिषदेतर्फे नव्हे तर स्वतंत्र गोपनीय संस्थेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. ‘टीईटी’ प्रमाणपत्रातील बोगसगिरीनंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या माध्यमातून १० नोव्हेंबरला ‘टीईटी’ घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना निकालाची प्रमाणपत्रे आता परिषदेतर्फे नव्हे तर स्वतंत्र गोपनीय संस्थेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. ‘टीईटी’ प्रमाणपत्रातील बोगसगिरीनंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय प्रश्नपत्रिका तयार करणारी व ‘ओएमआर’ उत्तरपत्रिका बनविणारी संस्था, या देखील स्वतंत्र आहेत.

शालेय शिक्षण विभागाने २०१३ पासून शिक्षक होण्यासाठी ‘टीईटी’चे बंधन घालण्यात आले. पण, अनेकांनी बनावट प्रमाणपत्रे मिळविल्याची धक्कादायक बाब समोर आली आणि राज्यातील त्याचे संपूर्ण नेटवर्क उघड झाले. त्यानंतर शासनाला ‘टीईटी’ प्रमाणपत्रांची पडताळणी देखील करावी लागली.

या पार्श्वभूमीवर भविष्यात असा प्रकार होवू नये म्हणून आता प्रश्नपत्रिका तयार करणारी संस्था, ओएमआर उत्तरपत्रिका बनविणारी संस्था व प्रमाणपत्रे देणारी संस्था स्वतंत्र करण्यात आल्या आहेत. त्या गोपनीय असून कोणालाही त्याची माहिती होणार नाही, याची खबरदारी शासनाने घेतली आहे. याशिवाय ‘टीईटी’च्या प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले असून परीक्षेचे संपूर्ण रेकॉर्डिंग त्यात होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक परीक्षार्थीची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार आहे.

‘टीईटी’साठी उमेदवारांची नोंदणी

  • पेपर एकसाठी उमेदवार

  • १,५२,५९७

  • पेपर दोनसाठी उमेदवार

  • २,०१,३३६

  • पेपर एकसाठी परीक्षा केंद्रे

  • ४३१

  • पेपर दोनसाठी परीक्षा केंद्रे

  • ५९८

कोणत्याही गैरप्रकाराला वाव राहिलेला नाही

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) १० नोव्हेंबरला होणार असून त्याचे नियोजन झाले आहे. जवळपास दोन लाख ५४ हजार उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. आता प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. प्रश्नपत्रिका, ओएमआर उत्तरपत्रिका, प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या संस्था वेगवेगळ्या असून त्या गोपनीय आहेत. त्यामुळे कोणत्याही गैरप्रकाराला वाव राहिलेला नाही.

- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

टीईटी अन्‌ टेट यामध्ये नेमका फरक काय?

इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांवर शिक्षक होण्यासाठी उमेदवाराला ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. तर इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागते, पण त्यासाठी गणित (विज्ञान शाखा), समाजशास्त्र (कला शाखा) अशा विषयांचे पेपर उत्तीर्ण व्हावे लागतात. तर इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांवरील उमेदवारांना ‘टेट’ उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. दरम्यान, डीएड-बीएडधारक कोणताही विद्यार्थी टेट किंवा टीईटी देवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT