Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

नैऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली तर काही भागात गारांचाही पाऊस झाला आहे. काल (रविवारी) संपूर्ण राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काहींना यलो अलर्ट दिला होता. आजही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. अकोला, बुलडाणा, जालना, हिंगोली, वाशिम, परभणी या जिल्ह्यांमध्ये आजही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यासह पालघर, मुंबई, ठाणे रायगड या भागातही आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्याच्या अनेक भागात आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवातही झाली आहे. मंगळवारपासून पावसाचा जोर पुन्हा कमी होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे.

तर नैऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावरही चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून, या वाऱ्याच्या प्रभावामुळे येत्या सोमवारी (ता. २७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची, तसेच बुधवारपर्यंत (ता. २९) त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात आज बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीचा 'ऑरेंज अलर्ट', तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पाऊस, गारपिटीचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली असून, किमान मध्येही वाढ कायम आहे. विदर्भात मात्र गारठा वाढल्याचे चित्र आहे.

पुण्यात या महिन्यात आतापर्यंत ४९.२ मिलिमीटर पावसाची नोंद

कडाक्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये पुणे शहरात काल (रविवारी) रात्री पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. गेल्या तीन वर्षांमधील सर्वाधिक पाऊस यंदाच्या नोव्हेंबरमध्ये पडला. पुण्यात या महिन्यात आतापर्यंत ४९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, येत्या चोवीस तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT