Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: दिवाळीवर असलेले पावसाचे सावट दूर; थंडी पुन्हा परतणार

ढगाळ आकाशामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू; गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिवाळीच्या उत्तरार्धात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत थंडी पुन्हा परतणार आहे. पुढील आठवडाभर तरी आकाश मुख्यतः निरभ्र राहून, सकाळी धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवाळी सणावर असलेले पावसाचे सावट दूर झाले आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मात्र पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ढगाळ आकाशामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे.

शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच ढगाळ हवामान निवळले असून, पुढील दोन दिवसांत थंडी पुन्हा परतणार आहे. पुढील आठवडाभर तरी आकाश मुख्यतः निरभ्र राहून, सकाळी धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे दिवाळी सणावर असलेले पावसाचे सावट दूर झाले आहे.

काल (शनिवारी) सकाळपासूनच आकाश निरभ्र होते. दुपारच्या कमाल तापमानातही बऱ्यापैकी घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दिवाळीच्या उत्तरार्धात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात जरी वातावरण कोरडे असले तरी कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मात्र पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे या काळात थंडीमध्ये वाढ होईल.

राज्यात आज (रविवारी) ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. राज्यात गारठा कमी झाला असून, गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे. पश्चिम-मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिमेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढेल. ढगाळ आकाशामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन...

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

SCROLL FOR NEXT