काही दिवसांपूर्वी भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या बाबरी मस्जिद संदर्भातील शिवसेना आणि शिवसैनिक यांच्या उपस्थितीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून तीव्र शब्दात चंद्रकांत दादा पाटील यांचा निषेध व्यक्त करत आहे. बाबरी मस्जिद पडली त्यावेळी शिवसैनिक प्रत्यक्ष हजर होते, हे पुराव्यासह सांगणारा शिवसैनिक आता पुढे आला आहे.
सकाळला दिलेल्या मुलाखतीत या शिवसैनिकाने आपण स्वतः अयोध्येला कसे पोहोचलो, तेथे काय घडले आणि आपण प्रत्यक्ष तिथे हजर होतो, याबाबत सविस्तर सांगितले आहे. (Chandrakant Patil babri masjid statement Controversy Sanjay muley challenging patil maharashtra politics news)
संजय मुळे (रा. सोनगीर, जि. धुळे) असे शिवसैनिकाचे नाव आहे. संजय मुळे सांगतात ज्यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांचं वक्तव्य मी ऐकलं त्यावेळी मनात प्रचंड चिड आली. जेव्हा बाबरी मस्जिद पडल्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार होतं नव्हतं त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या संपूर्ण घटनेची जबाबदारी घेतली होती.
यासह जर बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे अशा शब्दात सर्वांना सांगितलं होतं.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
आम्ही अयोध्येला गेलो होतो याचे सर्व पुरावे फोटो आजही माझ्याजवळ आहेत. एवढेच नाही तर तेथे आम्हाला कारागृहात बंदिस्त केल्यानंतर जेव्हा आमची सुटका झाली, तेव्हा तेथे मिळालेले प्रमाणपत्र देखील माझ्याजवळ आहे.
त्यामुळे बाबरी मस्जिद पाडताना शिवसैनिक नव्हते, असे म्हणणे केवळ चुकीचेच आहे. चंद्रकांत दादा पाटलांच्या या वक्तव्याचा आम्ही शिवसैनिक निषेध करतो, असे संजय मुळे म्हणाले.
"वयाच्या अठरा वर्षापासून बाळासाहेबांच्या भाषणांतून हिंदुत्ववादी विचाराप्रति प्रेरित झालो. मी म्हणूनच कार सेवक म्हणून अयोध्येची वाट धरली. आज काही लोक शिवसैनिक बाबरी मस्जिद पाडण्यासाठी अयोध्येत नव्हते, असे सांगतात तेव्हा मनाला फार वेदना होतात."
- संजय मुळे, शिवसैनिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.