राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत 3 वेळा महाविकास आघाडी बनवण्याचा प्रयत्न झाला असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. आज ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. धनंजय महाडिक, उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, २०१९ चा निकाल लागण्याआधी देखील मविआचा प्री-प्लॅन असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेमध्ये आमच दुर्देव होत. कालचक्र नेहमी फिरत असतं. आता महाराष्ट्रात (maharashtra) तुम्ही आहात. केंद्रात आम्ही आहोत. महाराष्ट्रात आम्ही वर होतो, खाली आलो. कधी काय होईल याचा कुणालाही अंदाज नाही असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात आम्ही वर होतो, खाली आलो. काय होईल कुणालाही अंदाज नाही
पुढे ते म्हणाले, २०१४ ते २०१९ या काळात तीन वेळा महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. एकदा तर अर्थसंकल्पी अधिवेशनात प्रयत्न झाला. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे तो यशस्वी झाला नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. विधानसभेमध्ये आम्ही १२० / १३० क्रॉस केला नाही हे दुर्दैव. थोडे कमी जास्त असते तरी अपक्षांना सोबत घेतलं असतं. मात्र जागा कमी आल्या तर भाजपला सोबत घ्यायचं नाही हे आधीच ठरलं होतं. संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजावली असल्याचेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.