Chandrakant Patil-Sanjay Raut e sakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हा दावा हास्यास्पद, पाटलांचा राऊतांना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दादरा-नगर हवेलीमध्ये शिवसेनेने (Shivsena) बाजी मारली आहे. राज्याबाहेर हा शिवसेनेचा पहिलाच विजय आहे. त्यामुळे आता शिवसेनेसाठी दिल्ली दूर नाही, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. त्यावरूनच आता चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) राऊतांना टोला लगावला आहे. ''डेलकर कोण आहेत? ते आधीपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का? मिळालेली मतं शिवसेनेची आहेत का?'' असे सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केले.

''दसऱ्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की तुम्ही दुसऱ्याचे उमेदवार घेऊन निवडणूक लढविली. पण, तुम्ही काय केलं. दादरा-नगर हवेलीमधील उमेदवार तुमचे होते का? आम्ही दुसरे उमेदवार घेतले तर आमच्यावर टिका-टिप्पणी केली जाते. पण, तुम्ही तेच करता त्याचे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते ''TV9 मराठी'' सोबत बोलत होते.

''दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेला विजय मिळाला. पण, डेलकर शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का? ते सातवेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे दिल्लीच्या राजकारणात जाणार हे दावे हास्यास्पद आहेत'', असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.

राज्य सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही -

''महाराष्ट्र सरकारने इंधनावरील कर कमी करायला पाहिजे. मात्र, त्यांनी तो दर कमी केला नाही. शेवटी केंद्राने दर कमी केला होता. कोरोनापासून इंधनापर्यंत सर्व गोष्टींकडे केंद्राकडे बोट दाखवतात. राज्य सरकार पेट्रोल -डिझेलबाबत सकारात्मक भूमिका घेणार नाही. कारण, त्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही.''

शेतकऱ्यांच्या खात्यात १४०० रुपये नुकसान भरपाई -

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यात जमिनी वाहून गेल्या पिके वाहून गेली. पण, शेतकऱ्यांच्या खात्यात १४०० रुपये नुकसान भरपाई जमा झाली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. प्रत्येक विषयात केंद्राकडे बोट दाखवून मोकळं व्हायचं हेच या सरकारला माहिती आहे, असंही पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT